पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण, पुन: कलिं आहेच. हा असा कलि आहे तरी कसचा ? जो कलि भीम- हनुमत्संवादांत ' अचिरात् प्रवृत्त होणार होता, तो पुढें युद्धानंतर कांहीं काळानें प्रवृत्त झाला, व श्रीकृष्ण निजधामास गेल्या दिवशीं, प्रवृत्त झाला ! हे सारे कलि एकच असेंही कोणी म्हणेल तेही आम्ही कबूल करूं. पण वनवासांत मग त्रेता व द्वापरांचा संधि कसा ? एवढाच प्रश्न आहे. द्वापर कमीत कमी २००० वर्षाचें ना ? मग १२ वर्षाच्या अवर्धीत त्रेता व द्वापर कसे आले ? गदायुद्धाचे वेळीं ' नुकतेंच ' कलि- युग लागणार होतें ! ( प्राप्तं कलियुगं विद्धि ! ) व तें श्रीकृष्णाच्या 'निर्गमनाच्या दिवशींच सुरू झालें ! म्हणजे सुरू झाले म्हणतां म्हणतां २६ किंवा ३६ वर्षे गेली की काय ? हा कलि १०००।१२०० वर्षाचा खास नव्हे. हा वारंवार लवकर येणारा कलि असावा. भागवता - ( - १ - ८ ) मध्येही शुकाचार्य व्यासांपासून भागवत द्वापाराच्या आरंभी शिक- त्याचा उल्लेख आहे:- ८ -- इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंमितम् । अधीतवान् द्वापारादौ पितुर्वैपायनादहम् || येथे ' द्वापर '२००० वर्षीचा घेतला तर मत्स्यकन्येच्या ठाई पराश- रापासून निर्माण झालेला व्यास व त्याचा पुत्र शुक हे दोघेही २००० वर्ष जगून होते असे गृहीत धरावें लागतें; पण हैं चमत्कारिक होय ! तेव्हां कलिद्वापरांचें वारंवार आगमन, त्रेताचें वनवासांत व द्वापरारंभाचें भागवतांत शुकाच्या वेळीं येणें, यावरून ही युगे लवकर लवकर पालट- •णारी असावीत असे म्हणणें भाग येतें. हा चार चार वर्षांचा युगपर्याय असावा. युग ' शब्द ' वर्ष ' ह्या अर्थी कोठें कोठें चुकून आढळतो. कलि- युगाचें वर्णन " सहस्रमेकं वर्षाणां तथा कलियुगं स्मृतम् । तस्य वर्षशतं