Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५८ पुराण निरीक्षण. पंचाशत्सु कलौ काले पट्त्सु पंचशतेष्वपि । समासु समतीतासु शकानामपि भूभुजाम् । सत्याश्रयस्य परमाप्तवता प्रसादम् । निर्मापितं मतिमता रविकीर्तिनेदम् ॥ हा लेख शके ५५६ ऊर्फ इ० स० ६३४ मधील आहे. या वेळी, कलिप्रारंभ भारतीय युद्धापासूनच झाला व तेव्हांपासून गतकलि ३७३५ वर्षे झालीं व चालू कलीचें ३७३६ वें वर्ष होतें, अशी समजूत होती, हें कळून येतें. पण हा समजूतीचा घोंटाळा आहे. इ० स० ६३४ मध्ये कल्पाचें ३७३६ वें वर्ष चालू होतें; तैं कलीचें समजण्यांत आलें; व कलिप्रारंभ व भारतीय युद्ध एकच समजून भारतीय युद्धापासून ३७३५ वर्षाचा काळ सांगण्यांत आला. हाच ३७३६ कल्पाचा काळ धरिला तर बरोबर भारतीय युद्धाचा, मीं मागें काढलेला काळच मिळतो. पहा:-- कल्पाचें चालू वर्ष ( इ० स० ६३४ वर्षी ) वर्षे कल्पापासून भारतीय युद्धापर्यंतची वजा केली, तर १८९७ वर्षे भारतीय युद्धापासून इ० स० ६३४ पर्यंत राहतात. यांत ६३४ वर्षे वजा केलीं, तर इ० पू० १२६३ हाच भारतीय युद्धाचा ३७३६ पैकीं १८३९ १८९७ ६३४ १२६३ काळ येतो. लहान युगांच्या अस्तित्वाचीं प्रमाणें ! वरील विवेचनांत युग म्हणजे एकच वर्ष असावें व चार युगें मिळून चतुर्युग किंवा नुसतें ' युग' होत असावें असें नुसतें तुम्हीं गृहीत धरून चाललां आहां; त्यास प्रमाण काय ? असा कोणीही आम्हांस प्रश्न करील. याकरितां या हजारों व लाखों वर्षांच्या युगांमधून आम्ही ४१५ वर्षीच्या युगांकडे कशी वाट काढिली, हें सविस्तरपणें सांगतों.