प्रकरण तिसरें. पूं. पासून १०००-१२०० वर्षांनी म्हणजे ख्रिस्तीशकाच्या प्रारंभापर्यंत ही ' मानवी वर्षांची ' व ' १००० मानवी वर्षीच्या कलीची पद्धति ठरली व प्रचालित झाली असावी. २४९ महाभारत व पुराणे यांच्यामधून जरी ' हजारों वर्षोच्या ' युगांचा कित्येक भागांतून उल्लेख आहे, तथापि, त्याच ग्रंथांच्या कित्येक भागांत असे कांहीं उल्लेख आहेत की, त्यांवरून मूळचीं युगें- भारतकाळीं- फारच थोड्या अवकाशाची असावीत, असे अनुमान काढणें भाग पडतें. पांच वर्षांचें युग. मद्रासचे प्रो. रंगाचार्य- ज्यांनी युगांचा उत्तम प्रकारें अभ्यास केलेला आहे त्यांनीं Indian Review मा. पु. च्या १९०० सालच्या अंकांत (पृ. ४५१ ) असे लिहिलेले आहे की- 66 माझ्या युगांच्या अभ्यासावरून मला असे दिसून आलेलें आहे की चतु- र्युगांच्या कल्पनेला ज्योतिः शास्त्राचा व इतिहासाचा आधार आहे; व ऐतिहा- सिक युगें हीं अर्वाचीन ज्योति: शास्त्रीय दीर्घ युगांपेक्षां बरींच प्राचीन असून, ऐतिहासिक युगांचा उगम ज्योतिःशास्त्रीय युगांच्या उगमाहून अगर्दी भिन्न आहे. ** * ** ऐतिहासिक युगें ह्रीं केवळ काल्प- निक नाहींत. ती युगें प्राचीन संस्कृत वाङ्मयाच्या सूक्ष्मावलोकनानें उत्पन्न झालेली असावीत असे मला वाटतें हें संस्कृत वाङ्मयाचे अवलोकन भारतीय युद्धाच्या वेळी कृष्णद्वैपायन व्यासानें केलेले असावें. " प्रो. रंगाचार्य हे पंचवर्षीच्या युगांविषय लिहितात की:- “ In ancient days they used to adjust the solar and the Lunar measurements of time by means of the device of a lustrum of five years known also by the name ofa Yuga. The data required for the formation of this lustrum are the durations of the Solar year and of the
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६४
Appearance