Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पहिलें.

  • पुराणांतील ( फार प्राचीन काळच्या ) राजांविषयीं हकीकती सांगणें हैं

सूतांचें कार्य; ( थोड्या दिवसांपूर्वी ) मेलेल्या शूर राजांचें वर्णन करण्याचें काम मागधांचें; जीवंत लढवय्या राजांची उत्तम प्रबंधांनी स्तुति करण्याचें काम बंदिजनांचें ! यावरून या प्रत्येकांची भिन्नभिन्न कर्तव्ये कळून येतील. याप्रमाणें सूतांमार्फत व्यासांनी अठराही पुराणसंहिता प्रचलित केल्या. व्यासांनंतरचीं पुराणे. ११ व्यासांनंतरच्या ग्रंथांत पुराणाचे एकवचनी उल्लेख न येतां अनेक वचनी उल्लेख येणार हे मागेंच आम्ही पाहिले आहे. जर कांहीं स्मृति- ग्रंथांत अनेकवचनी उल्लेख नसतील तर ते ग्रंथ व्यासांपूर्वीचे होत असें मानण्यास हरकत दिसत नाहीं. आतां आपण अनेक पुराणात्मक उल्लेख तपासून पाहू. कात्यायनस्मृति ( जिचा काळ कमीत कमी ३० पू० ४००/५०० इतका तरी समजण्यांत येतो ) या स्मृतिग्रंथांत असा उल्लेख आहे:-- मांसक्षीरौदनमधुकुल्य।।भिस्तर्पयेत्पठन् । वाकोवाक्यं पुराणानि इतिहासानि चान्वहम् ॥ १४-११॥ भृगूक्त मानवसंहिता ( जी पतंजलिभाष्याहून खात्रीनें जुनी व इ० पू० ३००-४०० हून अर्वाचीन असे कोणींच म्हणत नाहींत ) या स्मृतीत म्हटलें आहे कींः- स्वाध्यायं श्रावद्विषे धर्मशास्त्राणि चैव हि । आख्याना नीतिहासांश्च पुराणानि खिलानि च ॥३-२३२॥

  • यावरून जैमिनीच्या पूर्वीही पुराणांत राजांची वर्णनें होतीं हैं ककून

येतें; व तें आम्हीं पूर्वी पाहिलेलेच आहे.