प्रकरण तिसरें. २३५ या संस्कर्त्यानें वायु व मात्स्य यांतील खालील श्लोक* पाहून त्याचा अर्थ " २३०० वर व २४०० च्या आंत " पांडवांपासून आंध्रांच्या अखेरपर्यंत वर्षे झाली " असा घेऊन, नंदांपासून आंध्रांपर्यंतच त्यास ठाऊक असलेली ८३६ वर्षे २३५० मधून ( ही २३००-२४००मधील संख्या घेऊन ) वजा केलीं ! ! एवढा काळ यानें भारतीय युद्धापासून नंदांच्या प्रारंभापर्यंत ठरविला असावा; जसें २३५०-८३६ = १५१४ वर्षे - यानें महापद्मनंदापर्यंत ठरविली पण याच वेळच्या मनुष्यानें आंध्रांची एकंदर वेरीज ४६० वर्षे दिली आहेत ! ८३६ ही रकम आंध्रांचा काळ ४४२ वर्षे धरून आलेली आहे. यानें ४६० आंध्र, + ४५ काण्व, + ११२ शुंग, + १३७ मौर्य + १०० नंद अर्शी वर्षे धरून ८५४ वर्षे धरिलीं असावीं अगर कांहीं किंवा बहुतेक पुराणांनी ४५६ वर्षे आंध्रांची धरिली आहेत तशीं धरिली तर बरोबर ८५० च वर्षे होतात, तीं त्यांनी २३५० तून वजा करून १५०० वर्षे बरोबर परिक्षितीपासून नंदांपर्यंत ठरविली ! ! ! मग त्याचे १०० + १३८+ ३६२ ( १५०० ) असे विभाग पाडिले ! भिन्न ठिकाणच्या सम- कालीन राजांच्या बेरजा केल्या ! ! ! याचे वेळीं नंदापासून आंध्रांतां- पर्यंतचा काळ ८३६ ८५० किंवा ८५४ हा ठरलेलाच होता. तो या संस्कर्त्यास बदलणें शक्य नव्हता ! मग त्यानें मागच्या राजांचे काळ वाढवून देऊन १५०० वर्षे केलीं ! ! ! = ० - सप्तर्षयो मघायुक्ता काले पारीक्षिते शतम् । ब्राह्मणास्तु चतुर्विंशो भविष्यंति शतं समाः || मत्स्य.
- सप्तर्षयो मघायुक्ता काले पारीक्षितेऽभवन् ।
आंध्रांते च चतुर्विंशे भविष्यंति मते मम ॥ बायु.