प्रकरण तिसरें. यांत मत्स्यपुराणाप्रमाणे बेरीज ४४८३ वर्षे व वायूप्रमाणें बेरीज २७२३ वर्षे होते. महापद्मापासून आंध्रपर्यंत ८३६ वर्षे बेरीज होते असे सांगणा- ज्याच्या पुढे मात्स्याची यादी होती असें दिसून येईल; कारण, १००+ १३७ + ११२ + ४५ + ४४८३ मिळून ८४२३ वर्षे होतात. पैक, मात्स्याच्या यार्दीतील चंडश्री-शातकर्णीचा काळ १० वर्षे न धरितां ३ च वर्षे वायूप्रमाणें धरिला ( असा पाठ बेरीज करणान्याच्या काळीं असण्या- चा संभव आहे ) तर मात्स्याच्या यादीची बेरीज होते. मग ४४१३ यांची बेरीज ८३५३ वर्षे होते; ती स्थूल मानानें ८३६ वर्षे धरिली असावीत. याप्रमाणें पुराणांच्या अर्वाचीन भविष्यलेखकांनी महापद्मापासून आंध्रां- तापर्यंत ८३६ वर्षे ठरविलीं; पण यांत भिन्न भिन्न ठिकाणच्या समकालीन राजांनी एकामागून एक राज्य केलें असें भासवून त्यांची बेरीज केलेली आहे हीच चूक आहे. वरील बेरजांत वायूची संख्या २७२३ धरिली तर आंध्रांचा अंत मौर्यानंतर १३७+११२+४५+२७२३ = ५६६३ वर्षांनी म्हणजे इ. पू . ( ५६६ - ३१२ = ) २५४ या वर्षी येतो. - = आंध्रांचा ऐतिहासिक दृष्ट्या खरा अंत याच सुमाराचा आहे. ( Indian Review, July 1910) च्या अंकांत रा. आय्यर हे म्हणतात की आंध्रांचा अंत त्रैकूटक राजा ईश्वरदत्त यानें २४९ इ. स. च्या सुमारास केला ! वरील काळांत व यांत अगदर्दी थोडें अंतर आहे. ऐतिहासिक दृष्ट्या आंध्रभृत्यांचा काळ. २१७ हा मि. स्मिथ व रा. आय्यर यांच्या लेखांवरून व वरील मात्स्याच्या यादींवरून व इ.पू. १४८ च्याही पूर्वी ह्या वंशांचा प्रारंभ झाला होता, या माहितीवरून, व ईश्वरदत्तानें इ. स. २५० च्या सुमारास या वंशाचा अंत केला या माहितीवरून ठरवितां येतो. मि. स्मिथचा Early History of India हा ग्रंथ व रा. आय्यर यांचा The Saka and Samvat
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२३२
Appearance