Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०५ प्रकरण तिसरें, थोडासा खुलासा- हुएनत्सांगच्या ' सी-यू- की ' वरून मागें उतारा दिलेला आहे की, तथागताच्या निर्वाणानंतर १०० वे वर्षी अशोक नांवाचा एक राजा - बिंबिसाराचा पणतू होता. हा अशोक कालाशोकच असून त्याचें पुराणांतील महानंदाशी ऐक्य वर सिद्ध केलेलेच आहे. तेव्हां हा कालाशोक ऊर्फ महानंद बिंबिसाराचा पणतू म्हणून हुएनत्सांगनें दिलेले आहे; पण हा अजातशत्रूचा पणतू असेल तरच बरोबर जमतें. कांहीं असो. या परंपरेवरून एवढें तरी बरोबर ठरतें की शिशुनागवंशाचा शेव- टचा क्षत्रियराजा कालाशोक ऊर्फ महानंद हा बिंबिसार ( अगर बहुधा अजातशत्रु ) याचा पणतू होता; म्हणजे उदायीनंतर वंशाअखेरपर्यंत पुराणांत दिल्याप्रमाणे १/२ च राजे झाले. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी परंपरा टर्नरच्या महावँसोच्या प्रस्तावनेंत अशी दिलेली आहे की, कालाशोकानंतर धर्माशोकापर्यंत एकंदर १२ राजे झाले. तसेंच रॉकहिलने आपल्या बुद्धचरित्रांत तिबेटी परंपरा अशी दिलेली आहे की, अजातशत्रू- पासून धर्माशोकापर्यंत ( अशोकास धरून ) १० पिढ्या झाल्या. ह्या परंपरा कशा जुळतात हैं आपण पाहूं. नवनंद, चंद्रगुप्त, बिंदुसार व अशोक असे बारा राजे होतात. आतां अजातशत्रूपासून १० पिढ्या कशा होतात हे आपण पाहूं. अजातशत्रु, उदायी, नंदिवर्धन व महानंद या चार पिढ्या, नंदांच्या बौद्धमतें २८-२२-२२ वर्षीच्या तीन पिढ्या, चंद्रगुप्त, बिंदुसार व अशोक-या तीन पिढ्या - मिळून १० पिढ्या होतात. या एकंदर प्रमाणांवरून पहातां महानंद ऊर्फ कालाशोक हा अजात- शत्रूचाच पणतू असावा असें स्पष्टपणें वाटतें. यामुळे अजातशत्रु, उदायी नंदिवर्धन व महानंद यांचे पुराणांतील काळ- अनुक्रमें २५, ३३, ४०व ४३ वर्षे - बरोबर दिसतात. एरव्हीं अजातशत्रूच्या ८ वे वर्षापासून महा- नंदाच्या आरंभापर्यंत ९० वर्षे होणार कशी ? अजातशत्रूच बाकीची