परि. च्या जन्मापासून महानंदाच्या अभिषेकापर्यंत महानंदाचीं वर्षे नवनंदांचा खरा काळ प्रकरण तिसरें, ८३६ ७२ ( जुन्या पुराणमतें ) ९५१ एकूण दोन्ही तन्हांनी पाहिलें तरी चंद्रगुप्तापूर्वी ९५१ वर्षे म्ह. ३१२+९५१= इ. पू. १२६३ वर्षी भारतीय युद्ध झालें हैं बरोबर ठरतेंच. शिवाय, नंदाचा काळ १०० वर्षे मानल्यामुळे, महानंदापर्यंत ८३६ वर्षे झाली अशी जी मूळची परंपरा असेल तिचा अर्थ महापद्मापर्यंत असा कसा करण्यांत आला हेंही कळेल. कारण, वायुपुराणकर्त्यांनी तरी ८३६ वर्षीचा प्रारंभ कोठून धरावयाचा- पारीक्षितीच्या जन्मापासून का अभिषेकापासून हैं मोघमच ठेविलेले आहे. यावरून मूळची परंपरा महानंदापर्यंतच असावी असे वाटतें. 'नंदांतं क्षत्रियकुलं' याचा अर्थ ' नंदानें क्षत्रिय कुलाचा अंत झाला, ' असाच करावा लागेल; व येथें क्षत्रिय कुलांतला शेवटला राजा महानंदच घ्यावा लागेल. पण पुढें 'नंद' यानें महापद्मच घेऊं लागले. तेव्हां मूळची परंपरा " परिक्षिती- ( जन्मा ) पासून (महा) नंदाच्या अभिषेकापर्यंत ८३६ वर्षे झालीं; " अशीच " असावीसें खास वाटतें. याचा वायुपुराणाच्या सद्य:स्वरूपकर्त्यांनी असा अर्थ केला असावा को नंद म्हणजे महापद्मनंद होय. सारांश, ऐतिहासिकदृष्ट्या - वर्षे. ( १ ) परिक्षितीच्या जन्मापासून ( महा ) नंदाभिषेकापर्यंत ( २ ) महानंदाचा काळ ( ३ ) नवनंदांचा खरा काळ ( ४ ) चंद्रगुप्ताचा अभिषेक २०३ ८३६ ४३ ७२ ३१२ " 33
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१८
Appearance