प्रकरण तिसरें, येईल. शिवाय, ‘ महादेव' व ' ९५१ ' यांचे इतर पुराणांनीं भिन्न अर्थ केल्यामुळे कसे घोटाळे उत्पन्न झाले, हेंही कळून येईल. १९१ भिन्न आतां, चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक ३१२ इ. पू. ते ३२५ पर्यंत घरि- तात. यापूर्वी ९५१ वर्षे म्हणजे १२६३ ते १२७६ इ. पू. परीक्षितीचा जन्म व भारतीय युद्धाचा काळ ठरवितां येतो. जैन व बौद्ध परंपरांवरून चंद्रगुप्ताचा राज्यारोहणकाल इ. पू. ३१२ हाच पक्का ठरवितां येतो. या काळावरून परीक्षितीचा व भारतीय युद्धाचा काळ बरोबर इ. पू. १२६३ हाच ठरतो. चंद्रगुप्ताचा काळ. चंद्रगुप्ताच्या राज्याभिषेकाचा काळ इ. पू. ३१२ हाच आहे, या- विषयों जैन व बौद्ध प्रमाणे काय आहेत हैं आपण आतां पाहूं. याविषय स्मिथ साहेबांनी आपल्या Early History of India, ( p. 38, foote- note ) मध्यें म्हटले आहे कीं, “ It is quite possible that the Coronation took place some years later ( than B. C. 321 ) and the ● Mourya Era in which Kharavéla of Kalinga dates his inscription, may be identical with the Selenkidan era beginning in October 312 B.C. " इ. पू. ३१२ सालीं चंद्रगुप्ताचा राज्याभिषेक झालेला असणें अ गर्दी शक्य आहे असें स्मिथ यांचे म्हणणे आहे. तसेंच Historians' His. of the World, Vol II. मध्येंही इ. पू. ३१२ हाच चंद्र- गुप्ताचा राज्याभिषेककाळ दिलेला आहे. डॉ. भाऊ दाजी यांनी मेरुतुंगाचार्यांच्या थेरावलीचें सार दिलेले आहे. ( Literary Remains of Dr. Bhau Dàji, p. 130 पहा ). थेरा- वली ऊर्फ स्थविरावली यांत कल्पसूत्र, परिशिष्टपर्व, हेमचंद्राचें परिशिष्ट-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०६
Appearance