प्रकरण तिसरें. पुराणांत या परंपरांचा घोटाळा व विसंगतपणा आहे. फक्त वायुपुराणांत मात्र या परंपरेपासून काय सिद्धांत काढावयाचा तो बरोबर काढलेला आहे. परीक्षिती- ( च्या अभिषेका ) पासून महापद्मापर्यंत ८३६ वर्षे झाली, या जुन्या परंपरेवरून वायुपुराणकर्त्यानें ( अथवा भविष्यद्भागलेखकानें ) महादेवाच्या अभिषेकापासून परीक्षितीच्या जन्मापर्यंत ९५०-५१ वर्षे झाली, असें विधान केलेले आहे. १८९ जुनी परंपरा महापद्मापर्यंतच असण्याचे कारण आहे. महापद्मापर्यंत सर्व राजे क्षत्रियच होते. तेव्हां, क्षत्रिय राजे जाऊन शूद्रांच्या राज्यांची केव्हां सुरवात झाली व मध्यंतरी किती अवकाश गेला, म्ह. परीक्षितीच्या अभिषेकापासून महापद्माच्या अभिषेकापर्यंत किती अवकाश गेला याबद्दलची वर्षसंख्या चंद्रगुप्तादिकांच्या काळी असणें कांहीं अशक्य नाही. तशी परं- परा ( वर्षसंख्येची ) होती असे अनेक कारणांमुळे वाटतें. ( वायु व मत्स्यपुराणांतून मगधदेशच्या राजांच्या कारकीर्दीचीं वर्षे दिलीं आहेत. चंद्रगुप्ताच्या वेळच्या मॅगस्थिनीसनें आपल्या वेळेपर्यंतची बरोबर वर्षे दिलेली आहेत. यावरून वर्षाच्या याद्या तेव्हां असत असें दिसतें. तेव्हां कालगणनेच्या कांहीं तरी परंपरा असणें कांहीं अशक्य नाही. ) या परंपरे- प्रमाणें पाहतां परीक्षिती ( च्या अभिषेका ) पासून महापद्माच्या अभिषेकापर्यंत ८३६ वर्षे झाली ही परंपरा प्राचीन आहे. वायु व मत्स्य या दोहों पुराणांसही ती मान्य आहे. पण यावरून 'महादेवा' च्या अभिषेकापासून परीक्षितीच्या जन्मापर्यंत ९५०/५१ वर्षे होतात हें करें सिद्ध होतें ? याचा आपण विचार करूं. भारतीय युद्ध परीक्षितीचा जन्म परीक्षितीचा अभिषेक वर्ष १ १६वें
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०४
Appearance