प्रकरण तिसरें. सप्तर्षयो मघायुक्ताः काले पारीक्षिते शतं । ब्राह्मणास्तु चतुर्विंशा भविष्यंति शतं समाः ॥ ४३ ॥ मत्स्य पु. २७३. वायुपुराणांतून उतरून घेतलेल्या भागाचें भाषांतर माझ्या मतें असें आहे:- १८७ -- “ महादेवाच्या अभिषेकापासून परीक्षितीच्या जन्मापर्यंत १००१ वर्षे झालीं; पण त्यांत पन्नास वर्षे अधिक झाली; ( म्ह० ९५१ वर्षे झाली. ) यास प्रमाण असे की, ( परीक्षितीच्या अभिषेकापासून ) महाषद्मापर्यंत ८३६ वर्षे झाली असें मानतात. इतकाच काळ (महापद्मापासून) आंध्रांच्या अंतापर्यंत झाला, असें भविष्य जाणणारे, पुराण जाणणारे व श्रुर्तीत निपुण असे ऋषि म्हणतात. प्रतीप राजाच्या वेळी सप्तर्षि जे होते तेव्हांपासून आंध्रांच्या अंतापर्यंत २७ वे नक्षत्रांत येतील ( म्हणून २७०० वे वर्षीत येतील ). परीक्षितीच्या काळी सप्तर्षि मघांत होते. आंध्रांच्या अखेरीस २४ व्या नक्षत्र येतील असें माझें मत आहे. मत्स्यपुराणांतील भागाचे भाषांतर असें:- “ महापद्माच्या अभिषेकापासून परीक्षितीच्या जन्मापर्यंत ९५०/५१ वर्षे झालीं. पौलोमा नांवाचा जो ( शेवटचा ) आंध्र राजा त्यापासून महापद्मापर्यंत ८३६ वर्षे झाली. तसेंच, आंध्रांतापासून (?) परीक्षितीच्या वेळेपर्यंत आणखी तितकींच वर्षे गेली, असें पुराणे जाणणाऱ्या व श्रुतींत निपुण अशा ऋषींनी भविष्यांत सांगितलेलें आहे. परीक्षितीच्या काळी सप्तर्षि मधानक्षत्रीं होते, ते ब्राह्मण ( सप्तर्षि ) (आंध्रांच्या अंताच्या वेळीं) २४ व्या नक्षत्र असतील. " वरील दोन्ही उतारे महत्त्वाचे आहेत. दोन्ही पुराणांच्या मतें परीक्षिती- च्या अभिषेका ) पासून महापद्मापर्यंत ८३६ वर्षे व तसेंच, महापद्मा-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२०२
Appearance