प्रकरण तिसरें, १८५ येथेही एतद्वर्ष, एकवर्ष, व एकं वर्ष असे दुसऱ्या चरणांत पाठभेद आहेतच. असो. आतां भागवतपुराण काय म्हणते तें पाहूं तें म्हणतें:- आरभ्य भवतो जन्म यावन्नंदाभिषेचनम् । एतद्वर्षसहस्रं तु शतं पंचदशोत्तरम् ॥ १२-२ येथें परीक्षितीला पुराण सांगत असल्यामुळे 'तुझ्या जन्मापासून नंदा- भिषेकापर्यंत ' असें म्हटले आहे. यांत ' ज्ञेयं ' बद्दल ' शतं ' पद आहे, पण हाही लेखकप्रमादच दिसतो. कारण १०५० किंवा १०१५ यापेक्षां अधिक वर्षे मागच्या तिन्ही पुराणांनी सांगितलीं नाहींत. शिवाय, विष्णूनें तर सप्तर्षीच्या भाषेत या वर्षीच भाषांतरें करून मघांत पूर्वी सप्तर्षि होते; ते नंदाभिषेकाच्या वेळीं पूर्वाषाढा नक्षत्रांत येतील; म्हणजे १० नक्षत्रांचीं १००० वर्षे होतील; वर ५०/१५ झालीं तरी ११०० कांहीं होणार नाहीत असे सुचविलेले आहे. यावरून भागवताचा १११५ वर्षांचा 'शतं हा पाठ मूळचा नव्हे हें सिद्ध होतें. मूळचीं वर्षे १००० वर व ११०० च्या पेक्षा कमी असली पाहिजेत; असा विष्णुपुराणकर्त्यांनी अर्थ केल्याचें स्पष्ट दिसतें. मत्स्यपुराणकर्त्यांनी वायुपुराणांतील वरील श्लोकार्धाच्या उत्त- रार्धाचा कसा अर्थ घेतला होता हैं कळण्यास मार्ग नाहीं. कारण त्यांनी सप्तर्षीच्या भाषेत त्यांचें (वर्षोचें ) भाषांतर दिलेले नाही. सारांश, वरील सर्व विवेचनावरून एक गोष्ट आपल्या लक्षांत येईल; वायुपुराणांतील वरील श्लोकच पुढील पुराणांतील श्लोकांना व अर्थाना आधारभूत आहे. तेव्हां वायुपुराणकर्त्यांना हा श्लोक लिहिण्याला व हीं वर्षे सांगण्याला काय आधार होता हेंच आपणांस पाहिले पाहिजे. या दृष्टीनें आजपर्यंत या श्लोकाचें कोणीं अवलोकन केलेलें नाहीं, ही दुर्दैवाची गोष्ट होय. तथापि हा आधार वार गकर्त्यानें स्पष्टपणें देऊन ठेविलेला आहे. हा आधार मात्र पुढील एकही पुराणानें घेतलेला नाही. यावरूनच वायुपुरा-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२००
Appearance