प्रकरण तिसरें. १८३ म्ह. सांनी अधिक, म्हणजे ९५०, १ असा अर्थ ते घेतात. या श्लोकाच्या विपरीत अर्थज्ञानानेंच मत्स्य, विष्णु व भागवत पुराणांनी पुढें घोंटाळे माजविले हैं पुढील विवेचनावरून कळून येईलच. ' एकशत १०१, अष्टशत म्ह. १०८ अशा अर्थी संस्कृतमध्यें पतंजलीनें व आर्यभट्टानें शब्द वापरलेले आहेत. उदाहरणार्थ:- - यजुर्वेदस्य एकशत - शाखा भवंति ( महाभाष्य ) तसेंच आर्यभट्टाच्या ‘ आर्याष्टशता ' मध्ये ८०० आर्या नसून १०८ च आर्या आहेत. याव- , , रून ' एकसहस्रं ' असा पाठ असेल त्या वेळी १००१' एक हजार एक असा अर्थ करण्यास मुळींच हरकत पडणार नाहीं, असें मला वाटतें. आतां उत्तरषदांविषय विचार करूं. त्यांत दोन पक्ष असलेले सांगितलेलेच आहेत. कोणी ' एक हजार पन्नास ' असा अर्थ करितात व कोणी ' एकहजार पण ते पन्नासांनी अधिक म्हणजे ९५०' असा अर्थ करितात. या वायुपुराणांतील श्लोकावरून आपणांस ही गोष्ट कळून येतें कीं, महादेवाच्या अभिषेकापासून ( मागें ) परीक्षितीच्या जन्मापर्यंत १०५०, ९५० किंवा ९५० वर्षे झार्ली ! ( आपण जो अर्थ घेऊं त्याप्रमाणें ) आतां यांतील कोणता अर्थ बरोबर असावा, व वायुपुराणकर्त्यांनी किती वर्षे नक्की धरिली असावीत हेंच आपणांस पाहिले पाहिजे; व हें ठरविणेंच अत्यंत महत्त्वाचे आहे. वायुपुराणकर्त्याला अशी कोणती परंपरा माहीत होती की, जिच्या- योगानें ते आपणांस - परीक्षिताच्या जन्मापासून महादेवाच्या अभिषेकापर्यंत १०५०, ९५० किंवा ९५१ वर्षे झार्ली, असे सांगू शकतात ? या प्रश्ना- चा आपण जरूर शोध केला पाहिजे. शिवाय, वायुपुराणकार 'महादेव' पदानें कोणत्या राजाचें ग्रहण करितात हेंही ठरविले पाहिजे. हें ठरवि-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१९८
Appearance