पुराणनिरीक्षण,
- सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च ।
वंशानुचरितं यस्मिन् पुराणं तत्प्रकीर्तितम् ॥ शुक्रनीति, ४-३-५१ व ५२. एका राजाच्या कृत्याच्या मिषानें (निमित्तानें ) पूर्वी घडून आलेल्या अनेक हकीकती सांगणे याचें नांव इतिहास सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतरें व वंशानुचरित्र हीं ज्यांत असतात तें पुराण. या व्याख्येवरूनच कळून येईल कीं, इतिहासांत पुराणांतील बराच मजकूर घेतां येईल; पण पुरा- णांचें क्षेत्र मात्र जास्त विस्तृत आहे. २ आख्यान, उपाख्यान, गाथा, करपशुद्धि यांच्या व्याख्या विष्णुपुराण- टीकेंत श्रीधरस्वामींनी याप्रमाणे दिलेल्या आहेत. - - स्वयं दृष्टार्थकथनं प्राहुराख्यानकं बुधाः । श्रुतस्यार्थस्य कथनं उपाख्यानं प्रचक्षते ॥ गाथास्तु पितृष्टृथिवीप्रभृतिगीतयः । कल्पशुद्धिः श्राद्धकल्पादिनिर्णयः ।। स्वतः पाहिलेल्या गोष्टींचें कथन तें आख्यान होय; ऐकलेल्या गोष्टी सांगणें तें उपाख्यान होय; पितर, पृथ्वी, इत्यादिकांनी गायिलेल्या त्या गाथा; श्राद्धकल्पादिकांचा ज्यांत निर्णय असतो त्या कल्पशुद्धि. याप्रकारें एकदां व्याख्या माहीत झाल्या म्हणजे वैदिक वाङ्मयांत यांचा उल्लेख आला तर अर्थ नीट कळण्यास बरें पडेल. पुराणें किती प्राचीन आहेत ? पुराणं सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् । अनंतरं च वक्त्रेभ्यो वेदास्तस्य विनिर्गताः ॥ ३ ॥
- पुराणांनीं व अमरानेंही पुराणांचें हेंच लक्षण दिलेले आहे.