पुराणनिरीक्षण स्कंदपुराणाच्या ईशसंहितेपैकीं हालास्यमाहात्म्य म्हणून एक भाग आहे. त्याचें तामिळ भाषेत भाषांतर झालेले आहे. हे भाषांतर परंज्योति- मुनिवर यांनी अतिवीरराम पांड्यराजाच्या वेळीं इ० स० १६ व्या शतकाच्या अखेरीस केलें. याचें तामिळ नांव 'तिरुविलयादर्शपुराणं ' असे आहे. स्कंदपुराणाच्या अगस्त्यसंहितेचेंही तेलगू भाषेत भाषांतर झालेले आहे. परंज्योतिमुनिवर यांनी हाल|स्यमाहात्म्याचें १६ व्या शत- काच्या अखेरीस भाषांतर करण्यापूर्वीच दुसरें एक भाषांतर प्रचलित होतें. या हालास्यमाहात्म्यांत पांड्यराजांची यादी आहे, असें मि० एम्. शेषगीर- शास्त्री यांनी लिहिले आहे. ( Report of Sk & Tamil Mss. 1896-97, No 1; pt. 52-56). याहीपूर्वी तामिळ भाषेत स्कंद अवतरल्याचा उल्लेख आढळतो. कांजीवरम् ( कांची ) चे कश्यपस्वामिगळ् यांनी सुमारें इ० स० ७८० च्या सुमारास स्कंदपुराण तामिळमध्यें रचलें. तेव्हां त्यांत कोणकोणता व किती भाग होता, हे कळण्यास आम्हांजवळ साधन नाहीं; पण यावरून इ० स० ७८० मध्ये स्कंदपुराणाचा कांहीं तरी भाग असून तो भाषांतर रूपानें तामिळ भाषेत अवतरण्याइतका प्रसिद्धीस आला होता, हे उघड आहे. १३८ स्कंदपुराणाच्या ब्रह्मोत्तरखंडाचेंही तामिळ भाषेंत वरतुंगरामन् यांनी इ. स० १२ व्या शतकांत भाषांतर केलें आहे, असें वरील शास्त्रयांनी वरील ठिकाण ( पृ० ५६ ) लिहिले आहे. याच सुमारास तामिळीमध्यें कूर्म- पुराणाचें भाषांतर झाले आहे, असेही ते म्हणतात. एकंदरीत स्कंदपुराण तामिळ लोकांस फार प्रिय दिसतें. स्कंदपुराणाच्या कालिकाखंडाच्या प्रारंभी, पहिल्या अध्यायांत, संपूर्ण स्कंदपुराणाची अनुक्रमणिका दिलेली आहे. कालिकाखंडाच्या मतें या पुरा- णांत खालील सहा संहिता आहेत:- १ सनत्कुमारसंहिता, २५ खंड, १० हजार अध्याय.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१५३
Appearance