Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण, झालास्यखंड, हिमवत्खंड, महाकाळखंड, तीर्थखंड व पितृखंड तरी ४१ खंड झाले ! अजून ९ खंड राहिले ! यांशिवाय, यांत खालील भाग आहेत म्हणून प्रसिद्धि आहे:- अगस्त्यसंहिता, ईशानसंहिता, उमासंहिता, सदाशिवसंहिता, प्रल्हाद - संहिता, अधिमासमाहात्म्य, अंबिकामाहात्म्य, अयोध्यामाहात्म्य इत्यादि माहात्म्यें या अनेक प्रकारच्या माहात्म्यांनी व खंडांनी प्राचीन भारत- काळचा भूगोल भरपूर समजतो. तेव्हां भौगोलिकदृष्ट्या त्यांचें महत्त्व आहे, हैं विसरता कामा नये. विल्सन यांस काशीखंड, उत्कलखंड, ब्रह्मोत्तरखंड, रेवाखंड, शिव- रहस्यखंड व हिमवत्खंड इतके खंड मिळाले होते असे दिसतें. यांशिवाय, सुतसंहिता, सनत्कुमारसंहिता, सौरसंहिता, व कपिलसंहिता यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. हीं माहात्म्यें व या संहिता यांपैकी एकही मूळ स्कंदाचा भाग आहे असे यांस वाटत नाहीं !!! सह्याद्रिखंड हैं स्कंदपुराणांतर्गत आहे अशी प्रसिद्धि आहे. मि. गर्सन डी कुन्हा यांनीं इ० स० १८७७ मध्ये मुंबईस या खंडाची हिंदुस्थानांतील निरनिराळ्या ठिकाणच्या १४ हस्तलिखित प्रति जभवून, एक प्रत छापवून काढलेली आहे. त्या प्रतींवरून खालील माहिती देत आहे. या खंडाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन मुख्य भाग असून, शिवाय यांतच मोड- णारी सहा माहात्म्य आहेत. हैं खंड स्कंदपुराणांतील सनत्कुमारसंहितेंत होतें असें खालील ओळीवरून दिसतें. " इति श्रीस्कांदे, सनत्कुमारसंहितायां, सह्याद्रिखंडे, उत्तररहस्ये... ॥ " वरील छापील प्रतीत अध्याय व श्लोक हल्ली मिळतात त्याप्रमाणे दिलेले आहेत:- पूर्वार्धास 'आदिरहस्य ' व उत्तरार्धास ' उत्तररहस्य ' असेही म्हटले आहे.