Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. प्रचलित मार्कडेय पुराणांत नारद व मत्स्यपुराणांची लक्षणे सर्व आहेत. प्रचलित मार्केडेयांत ६९०० श्लोक आहेत; मग आणखी २१०० श्लोक कोठें गेले ? यास उत्तर असे की, प्रचलित मार्केडेय पुराणांत नरिष्यंत- चरिताच्या पुढचा मजकूर नाहीं. नरिष्यंतचरिताचा पुढें बराच मजकूर मार्केडेयांत होता ही गोष्ट नारदपुराणावरून कळून येते. तो ( लुप्त ) मजकूर या लोकसंख्येंत मिळविला तर श्लोकसंख्या बरोबर ९००० होईल. या पुराणांतील सप्तशति चंडीदेवीचा पाठ प्रसिद्ध असून सर्व लोकांस सप्तशति विश्रुत आहे. या पुराणांत अनेक जुनाट कथा अशा आहेत की ज्या दुसरीकडे कोठेंही आढळत नाहींत. प्रचलित पुराणांत जशी जुन्यानव्याची मिसळ असते तशी या पुराणांत बिलकूल नाहीं; शिवाय, या पुराणार्शी व्यासांचाही संबंध दाखविण्यांत आलेला नाहीं. श्रीशंकराचार्य, बाणभट्ट व मयूरभट्ट यांनी या पुराणाचा उल्लेख केलेला असल्यामुळे या ग्रंथास बराच प्राचीनत्वाचा मान मिळतो. नेपाळांत एक बौद्ध आचार्यानें ८०० वर्षापूर्वी लिहिलेली सप्तशतीची पोथी मिळालेली आहे ! आग्नेयपुराण, ८ वें. हल्ली अभिपुराण दोन तऱ्हेचें मिळतें; एक छापील ३८३ अध्यायांचें ( आनंदाश्रमांतील ) व जवळ जवळ १२ हजार श्लोकांचें; व दुसरें अप्रसिद्ध पं. ज्वालाप्रसाद यांस मिळालेले १८१ अध्यायांचें. नारदपुराणांत आग्नेयपुराणाची विषयानुक्रमणी याप्रकारें दिलेली आहे:- अथातः संप्रवक्ष्यामि तवाऽऽग्नेयपुराणकम् । ईशानकल्पवृत्तातं वसिष्ठायानलोऽब्रवीत् ||

  • विल्सन यांस फक्त पहिलें खंड ६९०० श्लोकांचेंच तेवढे मिळाले !

-