या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
आम्हाळा वगळा / आम्हांला वगळा, पहा जगतिं या राहील कांही तुम्हां ? विद्येची अधि दैवतें सकलही कोपून जातील ना, आम्हांला वगळा, जमेल कधि का संगीत वीणे विना ? तारा छेडुनि गोड गान करितो आम्हीच बालांत ना, आम्हाला वगळा, भकास बनुनी जातील विद्यालयें बालांची दुडदूड कोठुनि दिसे निर्जीव हो मंदिरें आम्हाला वगळा, खुशाल समजा ज्ञानामृताला सजा, पाया कोण भरील दिव्य कृतिच्या नेईल जो वैभवा आम्हाला वगळा, स्वतंत्र मतिची भावी पिढी होइ कां? ध्येयासक्त मनें, सुडौल शरिरें, कैसी गुरुजी विना ? आम्हाला वगळा सुविद्य जनता देशांत जागेल कां? संतांची वचनें शिवप्रभुकथा बालांत येतील कां? आम्हाला वगळा, सुराज्य जगिं या जन्मांत येईल का? आम्हाला वगळा, असे ठरत हा स्वामी जगाचा फुका. (६२)