Jump to content

पान:पुणें येथील वत्त्कृत्वोत्तेजक मंडळीचा सन १९०५-०६ सालचा रिपोर्ट.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८. ता० १ माहे जून सन १९०५ तागायत ता० ३१ माहे मे सन १९०६ पावेतों जमाखर्चाचा ताळेबंद सोबत जोडला आहे. यासालचे समा- रंभाकरितां मंडळीनी खर्चासाठी रुपये ५०० मंजूर केले होते. परंतु ताळेबंदा- वरून पाहतां ४०२८१०८२ खर्च झाला आहे असें दिसून येईल एकंदर उत्पन्न ६४५४८९ झालें आहे. परंतु या जमेच्या रकमेत व्याजाचें उत्पन्न ४१८८६४९ जमा आहेत ते सर्व या सालचे नसोन प्रामिसरी नोटाचें मागील सालचें कांहीं व्याज येणें शिल्लक राहिलें होतें त्यामुद्धां आहे. यासालीं खर्चापेक्षां जमेचें उत्पन्न जास्त झाल्याकारणानें मागील सालापेक्षां या साल अखेरची शिल्लक २४२८६८७ रुपयांनी वाढली आहे. याचप्रमाणे दरसाल जास्त प्रमाणावर उत्पन्न होऊन पुढील समारंभ चांगले रीतीनें पार पडतील अशी उमेद आहे.

(Sd.) K. R. Kelkar.


(Sd. ) G. K. Natu.


चिटणीस, वक्तृत्वोत्तेजक मंडळी, पुणे.