Jump to content

पान:पुणें येथील वत्त्कृत्वोत्तेजक मंडळीचा सन १९०५-०६ सालचा रिपोर्ट.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुणें येथील वक्तृत्वोत्तेजक मंडळीचा सन


१९०५/०६ सालचा रिपोर्ट.


 १. पुणें येथील वक्तृत्वोत्तेजक मंडळीची स्थापना होऊन ३६ वर्षे झाली.सन १९०६ सालचे मे महिन्यांत जो भाषण समारंभ झाला,तो एकतीसावा भाषण समारंभ होय.या मंडळींचें साल तारीख १ माहे जून पासोन तारीख ३१ माहे मे पर्यंतचें आहे.
 २. तारीख २७ माहे आगष्ट सन १९०५ पर्यंत सन १९०४-०५ सालाकरितां जी व्यवस्थापक मंडळी नेमली होती ती काम पाहत होती.या व्यवस्थापक मंडळीची सभा सन १९०५।०६ सालांत एकदां तारीख १३ माहे आगस्ट सन १९०५ रोजी भरली होती, त्यावेळी सभेच्या पूर्वीच्या ६,५०० रुपयांच्या आठ प्रामिसरी नोटा होत्या, त्यांपैकीं कांहीं नवीन ( रिन्यु )व कांहीं लहान लहान रकमेंची मिळून मोठ्या रकमेची एक ( कनसालिडेट ) करणें विषयीं ठराव झाला व नवीन एक प्रॉमिसरी नोट १,००० रुपयांची, पोस्टल ब्याँकेत असलेल्या रकमेची व मरकंटाइल व्यांकेत असलेल्या रकमेची विकत घेऊन सर्व नोटा रा. रा. कृष्णाजी रघुनाथ केळकर व रा. रा. रामचंद्र भास्कर पाळंदे यांचे नांव करण्याचा ठराव झाला. हल्ली सभेच्या ७,५०० सात हजार पांचशे रुपयांच्या प्रामिसरी नोटा आहेत. त्यांपैकी एकएकहजाराच्या तीन,दीडहजारांची एक व तीन हजारांची एक अशा पांचनोटा आहेत.
 ३. तारीख २७ माहे आगस्ट सन १९०५ रोजी साधारण सभा भरून सन १९०५।०६ सालाकरितां खाली लिहिल्याप्रमाणें नवीन व्यवस्थापक मंडळी नेमण्यांत आली.

अध्यक्ष.


रावबहादुर काशिनाथ बालकृष्ण मराठे.


उपाध्यक्ष.
रा. रा. विनायक रामचंद्र पटवर्धन
डॉ. गणेश कृष्ण गर्दै.