या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
[ ६ ] उपदेश. विशेष प्रार्थना. आइक नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपाशीं ॥ नाहीं भाव मज पडली लोकलाज | राहिलेसें काज तुझे पायीं ॥ जरी तुज कांहीं करणे उचित । तारीं तूं पतित तुका ह्मणे || पद-राग तोडी. पतितनको पावन कोजे । तुमबिन कछुहु न सूझे हो ॥ धृ० ॥ जो जो आये सरन तिहारे । ताहे प्रेम सुख दीजे हो ॥ इति ० ॥ १ राखो लाज बिरदबानेकी । मोहे अपनो कर लीजे हो ॥ १० ॥ २ ॥ मानपुरी प्रभु अधम उधारन । पल पल यह तन छी जे ॥ १० ॥ ३ ॥ भजन. अभंग प्रेम जडले तुझे पाय । आणिक ने सुचे मजला कांहीं ॥ १ ॥ रात्रि दिवस तुझें ध्यान । तेंचि माझें अनुष्ठान ॥ २ ॥ नामा परतें नेणें दुर्जे। ऐसे कळले मजला निज ॥ ३ ॥ तुका ह्मण अंतकाळीं । आह्मा सोडवीं तात्काळीं ॥ ४ ॥ -