[९] . आला धन्य सुदीन आजि कारतों देवा अम्ही उत्सवा । देई दर्शन दीनबंधू सकळां जेणे तरूं या मवा ॥ ठेवूं चित्त करूनि निर्मळ सदा त्वत्पादपद्मीं प्रभो । राहो तें भ्रमरापरी निशदिनीं गंगोनि तेथें विभो ॥ १ ॥ त्राता अन्य नसे तुझ्याविण आम्हां दीनां अनाथा जनां । कामादी रिपुवर्ग नित्य छळितो शांती मिळेना मना ॥ तेणें होऊाने त्रस्तचित्त करितों त्वद्भक्तिचा आसरा । धांवें उद्धरिं वत्सला अगतिका माता जशी लेकरा ॥ २ ॥ गाऊं नाम तुझें सदा गुणनिषे सप्रेम भावें मुख । ध्याऊं मंगलरूप नित्य हृदयीं जेणे वसू बा सुखी || वेंचूं सर्व शरीर हे प्रभु तुझ्या कार्यों बहू आदरें । अर्पू जीवन हे तुला विसरितां मोहाब्धि केवीं तरे ॥ ३ ॥ ( शिखरणी ) तुझ्या सेवे लाग अम्ही सकळ आलों तव गृहीं। करूं उत्सा- हा स्मरानि तुज येथे स्वहृदयीं ॥ तुवां यावें आजी त्वरित निज- भक्तां सुखकरी । अशा या इच्छेतें सफळ करि देवा झडकरी ॥ १॥ दिंडी. असो देवा तव चरणी आम्ही लीन | शरण आलों लेकुरें तुझीं दीन ॥ करूं तूझें प्रेमळ नामगान | जोंवरी या देहांत पंचप्राण || १ || थोर आम्ही अपराधी दीनबंधू । वे पदरीं
पान:पुणें प्रार्थनासमाज द्वाविंशतितमोत्सव.pdf/१०
Appearance