Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
शिकंदर
 

होते. पण या त्याच्या उद्गारांनीं पुढे सर्व साम्राज्याची दाणादाण उडाली; कारण समर्थ कोण याविषयीं मतभेद सुरू झाले. हळुहळू त्याची प्रकृति बिघडत चालली. राजवैद्यांनी सर्व कांहीं केलें पण गुण वाटेना. या वेळी त्याला केवळ बत्तिसावें वर्ष होतें! पण येवढ्याशा वयांत त्यानें केवढे साम्राज्य पैदा केलें! पराभव असा त्याचा कधी झालाच नाहीं; पण रूपसंपदा, धनसंपदा, दिलदारी, आणि जयश्री यांनी कायमचें वरिलेल्या या शूर वीरास दारूने पोखरून टाकले आणि कोणच्याही औषधोपचाराचा उपयोग न होतां हा शिकंदर बादशहा, कीं ज्याचें नांव चांगल्या नशिबाचें विशेषण होऊन बसलें आहे- तो कालवश झाला! ही गोष्ट इ० सनपूर्व ३२३ व्या वर्षी घडली.