बोलूं लागला. व मन मानेल तसें वर्तन करूं लागला. आपला ग्रीक पोषाख घालावयाचें सोडून देऊन तो जित लोकांचा पोषाख करूं लागला. कोणी मित्रसुद्धा समजुतीच्या गोष्टी बोलूं लागले तर तें त्याला खपेना. एकदां पारमेनिओ हा आपल्या जिवाला इजा करण्याच्या खटपटीत आहे अशी त्याला शंका आली आणि एकदम त्यानें त्या वृद्ध सरदारास फांशीची शिक्षा दिली. ज्या क्लायटसनें त्याचा जीव वांचविला होता त्याला दारूच्या धुंदीत त्याने ठार मारलें. शिकारींत एक हुजऱ्या आपल्यापुढे धावला म्हणून त्यानें त्यास चाबकाखाली झोडपलें. ॲरिस्टॉटलच्या पुतण्यास एक विद्वान् म्हणून त्यानें बरोबर नेलें होतें; पण तो हवें त्याला मान डोलवीना व इतर लोकांसारखा साष्टांग नमस्कार करीना म्हणून त्याने त्याची निर्भर्त्सना केली. येवढ्यानेंच झालें नाहीं. रोशन नांवाच्या आपल्या राणीच्या सहवासांत दिवसचे दिवस तो घालवू लागला. दारू पिणें हें तर ग्रीक लोकांच्या पांचवीलाच पुजलेलें; त्याही व्यसनांत तो निपचित पडून राहू लागला. पण इतकें झालें तरी पृथ्वी जिंकण्याचा त्याचा हव्यास तिळप्रायही हटला नव्हता.
त्याच्यापुढे काय आहे, त्याच्यापुढे काय आहे, हें पाहाण्याचा जें दिसेल तें जिंकण्याचा स्वतःचा हव्यास मात्र शिकंदरला जिंकतां येईना. वास्तविक पाहातां ग्रीक राष्ट्राच्या स्वातंत्र्यावर गदा आणू पाहणाऱ्या पर्शियन साम्राज्यावर त्यानें उठावें हें जरी साहजिक असलें तरी आतां तें सर्व साम्राज्य व त्या साम्राज्याचा सम्राट् या सर्वांचा त्याने अगदीं चोळामोळा करून टाकला होता; आणि म्हणून त्यानें परत फिरावयास हवें होतें. पण पर्शियन साम्राज्याच्या पूर्वसीमेवर आल्यावर त्याच्या कानीं भारतवर्षांतील संपत्तीच्या, व वैभवाच्या कथा पोचल्या असाव्या आणि जें राज्य आपण जिंकिलें त्यासारखींच मोठमोठी राज्ये व जे मुलूख पाहिले त्याहून सहस्रपट परम सुंदर प्रदेश आपण पुढे
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/२३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१८