Jump to content

पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४५
ऑलिव्हर क्रॉम्वेल
 


सर्वांस आनंद झाला हें सांगणें नकोच; पण पुढे त्याच्या जीवितात त्याच्यावर जीं मोठमोठाली संकटें आलीं व तसेंच त्याचा जो उत्कष झाला त्याचें हें पूर्वचिन्ह होतें असें मागील आठवण उकरून काढून, म्हातारे लोक पुढें मानूं लागले.
 ऑलिव्हर हा लहानपणीं चांगला बलदंड होता. शेतवाडीवर

राहणें, बक्खळ खाणेपिणें आणि उघडी हवा यांमुळें तो लहानपणापासून चांगला सकत किंबहुना अडदांडसुद्धां बनला. शहरच्या वस्तीत प्राप्त होणारें नागर वळण त्याला लहानपणीं मुळींच लाभले नाहीं; आणि मोठेपणी जेव्हां तें लाभण्याची संधि आली तेव्हां तो