पान:पायवाट (Payvat).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जर चंद्र ! आम्हीही कुणाची याद केली असती' असा या कवितेचा शेवट आहे. मराठी कवितेतील एका कवीने पोटाचा उल्लेख करावा हीच एक गोष्ट मान्यवर विद्यापीठांना अमान्य होते. पोट म्हणजे काय ? कवितेला वासना असू शकते. वासनेची विकृती असू शकते. पण कवितेत पोटाला स्थान काय ? या सर्व नवकवींनी आणि टीकाकारांनी सहजप्रेरणा म्हणून कामाचा स्वीकार केलेला आहे. काम स्वतःसिद्ध प्रकृत किंवा विकृत असतो. तो टाळू म्हटले तर टळत नाही. इतकी जाणीव या नव्या वाङ्मयाला आहे. कामाइतकीच बलवत्तर किंबहुना जीवनात कामाचा उदय होण्याच्याही पूर्वी अतिशय बळकट असणारी भूक ही दुसरी सहजप्रेरणा आहे. त्याला शास्त्रज्ञांची मान्यता मिळाली तरी अजून मराठी साहित्यिकांची मान्यता मिळालेली दिसत नाही. विशेषतः सुळेंच्या 'गाणे' या कवितेची रचना अत्यंत साधी असल्यामुळे ती चकरा देणारी आहे. वरवर पाहताना या कवितेचा एक-पदरी अर्थ दिसतो आणि तो अर्थ सर्वावरच अन्याय करणारा आहे. आम्ही उपाशी आहोत, उपाशीपोटी आम्हाला चंद्र पाहावा लागतो, जर आम्ही भरल्यापोटी चंद्र पाहिला असला तर आम्हालाही कुणाची आठवण झाली असती. असा या कवितेचा अर्थ दिसतो. आणि मग नवे क्रोध उसळून येतात. कविता ही पोट भरल्यानंतर करण्याची वस्तू आहे, असे सुर्वे यांना वाटते काय ? जे समृद्ध आहेत, जे श्रीमंत आहेत, ज्यांना खाण्यापिण्याची ददात नाही, त्यांना कवी होणे सोपे आहे असे सुसुर्व्यांना वांटते काय ? एखादे छानसे घरकुल असावे, त्यात बायको असावी, तिच्याशी प्रेमकजन करीत बसावे, ही जीवनाची परिपूर्णता आहे ? आणि पोट भरले की मग हे क्षुद्र स्वप्न पुरे होताच जीवन पूर्ण होते, असे सुर्व्यांना वाटते काय ? असे नानाविध प्रश्न डोळ्यांसमोर येऊ लागतात. एका कवीनेच सगळ्या कलात्मक व्यवहाराचा पोरकट उपहास केला. याची अनेकांना खंत वाटू लागते. पण हा या कवितेचा अर्थच नाही. या कवितेच्या अर्थापर्यंत जायचे असेल तर जरा वेगळ्या दिशेने प्रवास केला पाहिजे.

 या कवितेला आपण असे विचारले पाहिजे की जर भरल्या पोटाने चंद्र पाहिला, तर कुणाची तरी याद केली असती असे ही कविता सांगते. उपाशीपोटी ही कविता चंद्र पाहायला तयार नाही काय ? सुर्व्यांची सगळी कविता उपाशीपोटी चंद्र पाहणारी कविता आहे. किंबहुना उपाशीपोटी, पोट भरण्यापेक्षा चंद्र पाहण्याची जिद्द अधिक आहे. म्हणन मुर्वे कवी होऊ शकले. प्रश्न चंद्र पाहण्याचा नाही. चंद्र पाहणे भरल्यापोटी होणार आहे. चंद्र पाहणे उपाशीपोटीही चालू राहणार आहे. फक्त उपाशीपोटी पाहिला म्हणजे वेगळा दिसू लागतो. प्राचीन परंपरेपासून आपण हे मानीत आलो की पाहणाऱ्यांना के वेगळा दिसतो. विरहातील नायकाला चंद्र नायिकेसारखा दिसतो. नायिकेला विरहात शत्रू वाटतो, मीलनात मित्र वाटतो. आणि तपस्यांना चंद्र हा क्रोध गेलेल्या शुद्ध योग्यासारखा शान्त वाटतो. जेव्हा चंद्र भरल्यापोटी पाहिला जातो, तेव्हा चंद्राचे दर्शन नसले असते. उपाशीपोटी पाहिला असता चंद्र निराळा असतो. तो भाकरीसारखा दिसू लागतो या कवितेत गुलमोहराखाली छानसे घरकुल नांदले असते, असाही उल्लेख आहे. पण

नारायण सुर्वे यांची कविता १२३