Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ रघुनाथ यादव-विरचित १८१४ १८. पेशव्यांकडील सरदार पडले त्यांची नांवनिशी इकडे सदाशिवपंत आपल्या लष्करांत जाऊन नामी नामी धारकरी व सरदार व पागे व पतके व गाडद्यांतील जमातदार पडले होते ते रणांतून शोधून काढून कोणास पुरले, व कोणास अग्नि-डाग दिले, व ज्याची ओळख पुरली नाहीं असे जे सरदार चाकरमाने होते त्यांस एकेक्या गर्तेत पन्नास व शेदोनशें घालून खांचा बुजविल्या. ब्राह्मण-मंडळीस शेले दीड हजार कफनास २ लागले. या कलियुगीं दूसरे प्रत्यक्ष भारती यद्ध झाले. इराणी दुराणी व दिल्लीपत बादशाह वगैरे यांजकडील व सदाशिबपंत भाऊंकडील लोकांविषयीं व घोडेस्वाराविषयी व तोफखान्याविषयीं व पायदळाविषयींची बहुत खराबी जाहली ती लिहितां पुरवत नाही. पेशवे बहादूर यांजकडील थोरथोर सरदार व मानकरी व एकांडे व धारकरी व हुजरातींतील लोक पडले, त्यांची नांवनिशी मात्र लिहिली. इराणी दुराणी दिल्लीपत बादशाह वगैरे यांजकडील लोक पडले, त्यांची नांवनिशी ल्याहावी तर या कलियुग दुसरें भारत होईल ! यांकरितां श्रीमंतांकडील लोक लिहिले गेले. त्यांची नांवनिशी तपसिलवार अशी कीं :- १ बळवंतराव गणपत. १ गंगाधर नारायण १. बाळाजी भोईटे ४. १ नारायणसिंग रेडे. १ शिवराव अंबीकर. १ कृष्णाजी मोरे. १ चिमणाजी वाळके. १ अमृतराव चवळे. १ जयाजी भालेकर. १ दयाळ सिंग, १ सोनजी शिरके. १ नारो हरीं. १ सिधोजी भोसले रुजू शेवळे. १ तुकाजी गाढवे. १ सयाजी थोरात. १ हणमंतराव शितोळे. १ हरजी रणदेव. १ हणमंतराव मोचले." १ पदाजी मोहिते. १ लक्ष्मणराव मानगिरे. १ रहिमान गोरी. १ नरसिंगराव चोपडे. १ भिकाजी रासळे. १ भिवराव पवार, १ भिकाजी नळवडे. १ कृष्णाजी विष्णू. १ कमाजी सुरवे. १ लखमाजी गोडे. १ सिदोज़ी घारघे. (१) चाकरमाने-आश्रित. (२) कफन-मृताला गुंडाळण्याचे वस्त्रअंत्यसंस्कार हा अर्थ. (३) नागपूर प्रत-यापुढे ' भाऊसाहेबांनी भूलिगांचा पूजा आरक्त नरांची शिरकमले आणून केली, असे वाक्य आहे. (४) भोई पाठभेद. (५) मोचले-मचाले ? ।