Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणिपतची बखर निम७. दिल्ली-कुंजपुरा लुटून फस्त । या समयीं दोन शह रक्षुन निघावे यांतच उत्तम आहे, याप्रमाणे मनसोवा" करून सदाशिवपंत परम सक्रोध होऊन, बादशाहाचे तख्त जडित नवरत्नाचे मुवर्णाचे होते ते फोडून, त्यांतील मुवलख द्रव्य काढून, फौजेस वांटून, आपले बुद्धीने फौजा सांभाळून निघोन कालिदीतटाकास दाखल जहाले. जाटांत व सदाशिवपंतांत पादशाही तख्तामुळे अंतर्यामी परस्परें विकल्प वाटून आला. स्नहेभाव रक्षिल्यामुळे व्यंगोवती दिसों दिली नाहीं. केवळ सदाशिवपंतांनीं व जाटांनी एकमेकांस विरोध दिसों न दिला. परभारें जाट निघोन आपले देशाचे सरदेस गेले. इराणीसही आपले भय अणुमात्र जाटांनी दिसों दिले नाही. याप्रमाणे सूरजमल्ल जाटाचा मजकर पूर्ण सदाशिवपंतास कळोन आला. सदाशिवपंत यांनी आपली फौज व मल्हारजी होळकर व जनकोजी शिंदे वगैरे सारी फौज दक्षणची कराराची ६ सव्वा दोन लक्ष उरली व उत्तर खंडांतील मराठी फौज व रजपूत व रांगडे व मेवाती जादिकरून एक लक्ष एकण सव्वातीन लक्ष फौज येणेप्रमाणे जमाव एक ठिकाणी *लन, शिवाय पायदळ साठ सत्तर हजार, तोफखाना वगैरे कारखाना१० सुद्धा यमुनातटाकास इराणी येण्याचा रस्ता कोंडून, तोफखाना पसरून११ फळी१२ धरून चौफेर फौजा उतरविल्या. दाणावैरणीकरितां बादशाही खालचा मुलूख अगदी वीस पंचवीस गांवपर्यंत चौफेर बेचिराख3 झाला. दाणावैरण अगदीं बंद हीली. शेराची धारण झाली. तेही मिळेनाशी झाली. वीस पंचवीस हजार काज चौफेर १४ दिवसाचे मजलीस जाऊन भरस्वती गांव असतील ते लुट्न भाव तेव्हां अन्नपाणी मिळावे, याप्रमाणे जहालें, खजीना ही चालेनासा (१) मनसोबा-विचार. (२) तख्त-सिंहासन-रुप्याच्या छताचा हा उल्लेख आहे. (३) कालिदी-यमुना. (४) व्यंगोक्ती-उघड वैर. (५) सरदसरहद्द. (६) कराराची-निश्चयाची. (७) रांगडे-गुजराथ, मेवाड येथील हवासी (८) मेवाती-बंडखोर. (९) फौज-घोडदळ. (१०) कारखाना

(११) पसरून-मांडून. (१२) फळी-दाट रांग. (सैन्याची). । बचिराख-ओसाड. (१४) याबद्दल नागपूर प्रत व पुणे प्रत २-फौज

"परिवार. (११) चार दिवसांचे.