Jump to content

पान:पाणिपतची बखर.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३६) प्रभावी मनोदर्शन : भाऊसाहेबांचे व्यक्तिचित्र व मनोदर्शन हा या वखरींतील कलात्मक दृष्ट्या विशेष संपन्न असा भाग म्हणता गेईल. इतिहासकार भाऊंचे गुणदोष सांगतात, त्यांच्या कृतीची मीमांसा करतात. त्याचे डावपेच कसे यशस्वी झाले वा फसले ते दाखवितात. यापलीकडे त्या प्रत्यक्ष संग्रामप्रसंगी भाऊसाहेबांची मन:स्थिति काय झाली असेल, कोणत्या विकारविचारांनी ते वेढले असतील हे जाणणे, त्यांच्याकडे ' माणूस ' म्हणून पाहणे हे बखरकाराने साधलें आहे. दुर्घट समय प्राप्त झाला असतां भाऊंनी केलेले उदासपणाचे भाषण, त्यांत व्यक्त झालेली विश्वासरावासंबंधीची भावना ह्या भाऊंच्या मनोदर्शनांत बखरकार इतिहासातील घटनात्मक सत्यापलीकडे भावसत्यापर्यंत कशी झेप घेतो याचे प्रत्यंतर येते. पाणिपतची बखर चाचल्यावर कितीतरी वेळ भाऊंचे हे उललेले हृदय आपल्या मनाची पकड ऐडत नाही. प्रक्षुब्ध भाऊंची विश्वासरावाने घातलेली समजूत व दारुण प्रसंगी त्याने प्रकट केलेला निर्धार यांचा ठसाही मनावर दीर्घकाल राहतो. रणांगणावर मानवी मनाची विचित्र विलसिते कशी दृष्टीस पडतात याचे हे उदाहरण लक्षणीय आहे. निधड्या छातीचे भाऊ विश्वासरावाला आपण मरणाचे घरी आपले म्हणून गहिवरतात तर कोवळा तरुण विश्वासराव मोठी समजूत व प्रौढ बुद्धी प्रगट करतो. रणांगणावरील आणखी एक प्रसंग असाच विलक्षण आहे. मल्हार रामचंद्र रणांत आक्रंदत पडलेले असतात. त्यांचा पुत्र ते दुःख पाहून त्यांना ‘पुरे करतो' (पूर्णपणे मारतो) नंतर आपला शिरच्छेद करावयास तो उद्युक्त होतो. ते पाहून भाऊसाहेव सद्गदीत होतात व त्याची समजूत घालतात, ‘ आत्महत्या करू नये, उदईक सर्व आपण इंद्रसभं स जाऊ !' (पृ. २२) रणांगणावरील रणधुमाळी बरोबरच मानवी मनाची ही घडामोड रघुनाथ यादवाने बखरीत चित्रित केली आहे. हे या बखरीचे मीठे कलात्मक यश होय. रघुनाथ यादवानें कांहीं प्रसंग मात्र अगदी त्रोटक दिले आहेत. बळवंतराव मेहेंदळे युद्धांत मारले गेले व त्याची पत्नी सती गेली हो।