पान:पाकिस्तानचे संकट.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास वर येऊ लागली; शिखांची महिम्नस्तोत्रे रचिली जाऊ लागली आणि अँग्लोइंडियनादि वर्गहि पुढे सरसावू लागले ! मुसलमानांचे हुकमी बुजगावणे आपल्या हातांतून गेलें असें लखनौ-करारामुळे नोकरशाहीला वाढू लागल्यामुळे, तिच्यांतल्या काही उपद्व्याप्यांनी, नवीं बुजगावणी निर्माण करण्याच्या नादांत, संरक्षण मागणारी कांहीं नवीं कळसूत्री बाहुली निर्माण केली असतील, हे अगदीं शक्य आहे. माँटेग्युसाहेब हिंदुस्थानांत आले व पाहाणी करीत हिंडू लागले. संरक्षण मागणाऱ्या लोकांमध्ये लागलेली अहमहमिका पाहून त्यांना काय वाटलें असेल याची कल्पना त्यांनी लिहुन ठेविलेल्या Indian Diary मधील पुढील उताऱ्यावरून करता येईल. ते लिहितात : What strikes me astounding about these nonBrahmanas is that although they are vigorous enough to object to the influence of the Brahamanas, they lie on their stomachs and appeal to the Government for help instead of fighting; and although there is the beginning of the most promising party system here, they want to spoil it by the horrible extention of communal representation. (ब्राह्मणांच्या वर्चस्वाला हरकत घेण्याइतके हे ब्राह्मणेतर खंबीर आहेत. असे असून ते लोळण घेत मदतीसाठी सरकारची याचना करतात, स्वतःच झगडत नाहीत, हा प्रकार मला अतिशय आश्चर्यकारक वाटतो. पक्षसंघटनेची नामी सुरुवात करण्याच्या दृष्टीने ही संधि चांगली आहे. तरीहि, जातवारीच्या प्रतिनिधित्वाचा भयंकर विस्तार करून ब्राह्मणेतर त्या संधीचा बिघाड करीत आहेत.) लोकशाहीच्या वाढीला जातवारीचे तत्त्व मारक आहे याची जाणीव मोलैंप्रमाणेच माँटेग्युसाहेबांनाहि होती; कारण, ते आपल्या डायरीत लिहितात: We must beware of this system which Morley introduced; for it is fatal to the democratization of institutions and causes disunion between the Hindu and the