पान:पाकिस्तानचे संकट.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास घातलेल्या चढाईच्या भयानक बातम्या पुरवीत असे. या बातम्यांच्या स्वरूपाचा उलगडा पुढील उताऱ्यावरून होण्यासारखा आहे: This alarm concerning Russian invasion and encroachment was not on one side only. Just as British Rulers regarded an advance from the North on India to be imminent, so the Czar's ministers were afraid of an insurrection among the Muslims of central Asia fomented from India. They were told by their secret service agents that Afganistan was to be made the starting point where troops and ammunition would be massed for an advance on Russian territory. The Muslims of Turkestan would be roused to revolt against — Holy Russia' and the Indian Muslims would be employed for that purpose.* (रशियाची स्वारी व रशियाकडून होणारे आक्रमण या संबंधांतली भीति केवळ एकतर्फी नव्हती. उत्तरेकडून हिंदुस्थानवर होणाऱ्या स्वारीच्या भीतीमुळे ब्रिटिश राज्यकर्त्यांचा जीव धाकधूक होत असे. त्याप्रमाणेच, झारच्या प्रधानमंडळालाहि असें भय वाटे की, हिंदुस्थानांतून मिळणाऱ्या चिथावणीमुळे मध्य आशियांतील मुसलमान बंड करून उठतील. अफगाणिस्थान में केन्द्र कल्पून, तेथें सैन्य व दारूगोळा जमा करून, रशियन मुलुखावर चाल करून जाण्याचे बेत सुरू असल्याचे वृत्त या प्रधानांना गुप्त हेरखात्याकडून कळविले जात होते. तुर्कस्थानमधील मुसलमानांना 'पवित्र रशिया' विरुद्ध बंड पुकारण्याची चिथावणी मिळणार आणि त्या कामी हिंदुस्थानांतील मुसलमानांचा उपयोग केला जाणार, असे त्यांना कळत होते.) हेरखात्याकडून प्रसृत करण्यांत येणाऱ्या गोष्टी स्वीकारतांना फार काळजी घ्यावी लागते हे खरे; पण रशियाचें हेरखातें रशियन सरकारलाच खोटी माहिती पुरवील हे तरी संभवनीय कसे मानावें ? लष्करी धोरणाच्या दृष्टीने हिंदुस्थानांतल्या मुसलमानांना प्राप्त झालेले हे महत्त्व लक्षात घेतले म्हणजे त्यांचे इतरहि बाबतींतले छंद पुरविले जावे हे क्रमप्राप्तच दिसते. त्यांत त्यांच्या राजनिष्ठेची भर पडली! मग, मुसलमानांचे पारडे प्रत्येक *The Challenge of the N. W. Frontier by C. F. Andrews.