पान:पाकिस्तानचे संकट.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुसंघटनेचा महामंत्र २२९ हैं महर्षि व सेनापति या दोन्ही पदव्यांना पात्र ठरलेले सेनापति बापट यांनी निःसंदिग्धपणे सांगितले आहे. .. हजारोंचा तनु-त्याग जुटाया देश हा व्हावा। हजारोंचा तनु-त्याग सुटाया देश हा व्हावा ॥ असें सेनापति बजावून सांगत आहेत. हजारोंच्या तनुयागांत फासावर आनंदानें चढणाऱ्या क्रांतिवीरांचा अंतर्भाव सेनापतींनी केला असेल,हें त्यांच्या चरित्राच्या व चारित्र्याच्या अवलोकनावरून पटण्यासारखे आहे. पण, हा तनुत्याग एवढ्या मर्यादित अर्थानेच सांगितलेला आहे, असे समजण्याचे कारण नाही. हिंदू समाजांतील दैन्य, दारिद्रय, भोळेपणा, निराशा यांची हकालपट्टी व्हावयाची असेल तर त्या कार्यांत अहर्निश झिजणारे । आणि अशा रीतीने झिजून तनुत्याग करणारे हजारों मिशनरी पुढे • आले पाहिजेत, अंसाहि सेनापतींच्या म्हणण्याचा आशय असू शकेल. योग्य मनोवृत्ति ज्यांच्या ठिकाणी बाणली आहे, अशा तरुणांनी आयुष्याची उमेदीचीं कांहीं वर्षे तरी या हिंदुसंघटनाच्या उदात्त कार्यासाठी दिली नाहीत तर हिदुराष्ट्र उद्धरेल हा संभव फार कमी आहे. मानव्याचा उद्धार आणि हिंदु राष्ट्राचा उद्धार या गोष्टी परस्परांपासून फारशा भिन्न नाहीत. हे ओळखून तरी, हिंदु तरुणांनी संघटनानुकूल वृत्ति जोपासिली पाहिजे. सध्यांच्या तरुणांत वाढत चाललेली विलासी वृत्ति पाहन सेनापतींचे अंतःकरण कसे कळवळते याची जाणीव हिंदुतरुणांना होणें अवश्य आहे. "जुटे कैसा, सुटे कैसा, विलासी नीति जों वाढ़े" असा हृदयाला पीळ पाडणारा प्रश्न हिंदु तरुणांना विचारून, सेना पतींनी विलासी नीतीचा त्याग करण्याचा आदेशच त्यांना दिलेला आहे. हिंदुसंघटनाचे कार्य अशा उंच पातळीवरून होऊ लागले तर ब्राह्मण-- ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य असे सर्व प्रश्न एका पिढीत पार सुटून जातील. . ब्राह्मणांत दामाजीपंत निर्माण झाले की त्याच्या संकटकालीं । धाव घेणारे विठू महार अस्पृश्य समाजांत निर्माण होतातच!