पान:पाकिस्तानचे संकट.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुसंघटनेचा महामंत्र २२७ मनाने स्वागतच करील. : भोवतालच्या सृष्टीत पक्ष्यांची किलबिल सुरू झाली आणि इतर प्राणिमात्रांची हालचाल सुरू झाली की, आरोग्यसंपन्न माणसाला प्रभातकाळ जवळ आला म्हणून आनंद वाटतो. तद्वतच, ब्राह्मणेतरांमधील जागति पाहून निरोगी मनाच्या ब्राह्मणांना आनंदच वाटला पाहिजे. आज हा आनंद अभावाने तळपत आहे. आणि याचे कारण असें आहे की, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या दोन्ही समाजांत खरी मोठ्या मनाची माणसें थोडी आहेत. “मनो वो महदस्तु च" या वचनाचे स्मरण व्हावें तितक्या तीव्रतेने दोघांनाहि होत नाही. मनाचा मोठेपणा समाजांत दिसत नाही हे केवळ सामाजिक प्रश्नांच्या चिघळलेल्या स्वरूपावरूनहि सहज लक्षात येण्यासारखे आहे. समाजांतील कानीन संततीचा प्रश्न हा जणूं कांहीं बेवारशी प्रश्न आहे असें आज मानले जात आहे; आणि, कानीन संततीकडे पहाण्याच्या समाजभर पसरलेल्या अनुदार वृत्तीमुळे, कितीतरी भ्रूण हत्या रोज गल्लोगल्ली घडत आहेत. 'भ्रूणहत्यां वा एते घ्नन्ति ' अशी वचनें नित्यपाठांत ठेवणाऱ्या हिंदूंना या भ्रूणहत्यांचे महत्त्व आकलन करता येत नाहीं; इतकेच नव्हे तर, या भ्रूणहत्या ज्या दुर्दैवी स्त्रियांच्या हातून होतात, त्या स्त्रियांना कुलटा, पतिता वगैरे शेलकी विशेषणे लावतांनाहि समाजाचे मन अद्याप खिन्न होत नाही. या पतितांना पतित कोणी केलें या प्रश्नाचा विचार समाज कधीं : करतो काय? आणि या दुर्दैवी भगिनी पतिता आहेत असेंहि क्षणभर मानले तरी, त्यांची हिंदु संतति पतित नाहीं ना ? अशा संततीलाहि पतित म्हणण्याइतके शुचिर्भूत लोक हिंदु समाजांत असतील तर त्यांना ख्रिस्ताच्या चरित्रांतील एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली पाहिजे. एका उन्मार्गगामी स्त्रीच्या मागे समाजकंटक हात धुवून लागत आहेत असें दिसल्यावर त्रिस्त त्या समाजकंटकांकडे वळला आणि म्हणाला, " स्वतःचें चारित्र्य धुतल्या तांदळासारखे आहे असें ज्याचा अंतरींचा ईश्वर म्हणत असेल त्याने या भगिनीवर खुशाल दगड भिरकवावा." ख्रिस्ताचे शब्द ऐकतांच सारे समाजकंटक निःशब्द बनले. कारण, ज्यांची चारित्र्य धुतल्या तांदळासारखी असतात ते समाजांतील सत्पुरुष अभागिनी स्त्रियांचा छळ करण्याला प्रवृत्तच होत नाहीत. TET