पान:पाकिस्तानचे संकट.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राष्ट्ररक्षण व शांततारक्षण १८३ पाकिस्तान मान्य केल्याने परक्यांचें प्रवेश-द्वार' म्हणून प्रसिद्ध नारी असलेला वायव्य सरहद्दीचा निमुळता दरवाजा सताड उघडा या पडत असल्यामुळे, त्या दरवाज्यांतून कोणकोण आंत घुसत आहेत, या लोकांची पाकिस्तानमधील मुसलमानांशी कांहीं खलबतें चालली आहेत की काय, पूर्व सरहद्दीवरील मुस्लीमराज्यांतले मुसलमान बंगालच्या उपसागरांतून हिंदूंच्या कोणा शत्रूला आंत घेत आहेत की काय, इत्यादि गोष्टींकडे डोळ्यांत तेल घालून पाहण्याची कटकट हिंदुस्थानला स्वराज्य प्राप्तीनंतरहि टाळतां येणार नाही. अंतर्गत शांततेचे प्रश्न, भोंवतालच्या मुस्लिम-राज्यांमुळे उद्भवणारे प्रश्न, त्यांतून निघणारे संभाव्य धोके, या सर्वांना पुरून उरण्याइतकें सामर्थ्य हिंदुस्थानला एकवटावयाचे असेल तर, तें कटकटी टाळल्याने साधण्यासारखें नाही. याशिवाय, जगाच्या चावडीवर काय चालले आहे तिकडेहि हिंदुस्थानला जागरूकपणे लक्ष पुरवावें लागेल. ऑस्ट्रेलियांतील इंग्रज वसाहतवाले काय करीत आहेत, ब्रह्मदेशावर कोणकोणत्या पापी ग्रहांची नजर आहे, सीलोनला कोणकोणते भुंगे पोखरीत आहेत, जपानचे मनसुबे काय चालले आहेत, चीनच्या राजकारणाचा रंग कसकसा बदलत आहे या सर्व लगतच्या गोष्टी साक्षात् समजाव्या म्हणन या सर्व भागांत हिंदुस्थानला वकिलाति थाटाव्या लागतील, गुप्तहेरांची जाळी पसरावी लागतील, व्यापारधंद्यांच्या मिषाने माणसें पेरावी लागतील, तत्त्वज्ञानी व धर्मोपदेशक म्हणून माणसें हिंडवावीं लागतील अशा एक ना दोन, शंभर उलाढाली आणि खटपटी कराव्या लागतील! आणि हे सारें कल्पनाचित्र फक्त हिंदुस्थानच्या एका बाजूच्या विभागापुरते मर्यादित आहे. हिंदुस्थान हा जगाचा मध्यबिंदु आहे. त्याचे सौंदर्य, समृद्धि, त्याची संपन्नता इत्यादि गुणांमुळे त्याच्याकडे हजारों लोकांची पापी दृष्टि सतत वळलेली राहावयाची! या पापी दृष्टीची बाधा होऊन, आपला हिंदुस्थान फिरून पारतंत्र्याच्या गर्तेत पडूं नये, यासाठी हिंदुस्थानांतल्या हिंदूंना उत्तर-दक्षिण अमेरिकेंत, मध्ययुरोपांत, मध्यआशियांत, आफ्रिकेंत, अशा सर्व ठिकाणी नाना मिषांनी नानात-हेचे उद्योग करावे लागतील. हे उद्योग करावयाचे म्हटलें म्हणजे कटकटी आल्याच ! इत्यर्थ असा की, कटकटी टाळण्याचे तत्त्वज्ञान पाकिस्तान वगळून उरलेल्या हिंदुस्थानचेंहि स्वातंत्र्य