पान:पाकिस्तानचे संकट.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट उत्तर असें आहे की, आम्हांला दोन्ही गोष्टी पाहिजे आहेत आणि धोरणीपणाने वागून त्या दोन्हीहि आम्ही मिळविणार आहोत. ब्रिटिश सत्ता चालू युद्धांत लुली लंगडी ठरेलच असा संभव आज तरी दिसत नाही. आणि ती तशी ठरलीच आणि पाकिस्तान सिद्ध करण्याला तत्कालीन गोंधळांत मुसलमान प्रवृत्त झालेच तर, हिंदुहि अगदी स्वस्थच बसतील असें तरी डॉ० आंबेडकर कां गृहीत धरून चालतात? पांच वर्षांपूर्वी हिंदूंमध्ये लष्करी धोरणाबाबत जी दृष्टि नव्हती ती आज निश्चित निर्माण झालेली आहे. आणि चालू युद्धाच्या सुरुवातीपासून सरहद्दीच्या संरक्षणाची जी दक्षता घेण्यांत आलेली आहे तीहि उपकारक ठरत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत हिंदूंच्या हाती एकच गोष्ट आहे. पाकिस्तान सिद्ध होऊ न देण्याचा आपला निश्चय कृतीत उतरावा म्हणून त्यांना शक्य तितकें संघटित, सबल व प्रबल झाले पाहिजे व त्यांना तसे होतांहि येईल! आणि, काही अपवादात्मक अवलिये सोडले तर, बाकीचा जाणता हिंदुसमाज या उद्योगाला लागला आहे, हेंहि निश्चित आहे. ब्रिटिश सत्ता. युद्धसमाप्तीनंतर येथे टिकली तर तिने पाकिस्तानला मान्यता देऊं नये आणि हिंदुस्थानच्या लष्कराच्या बाबतींत हिंदूंना होत असलेला अन्याय बंद व्हावा यासाठीहि हिंदूंना एकजुटीने, नेटाने व धोरणाने वागावें लागेल. 1 As against the Hindus, the Muslims somehow always succeed* जल जति न गर (कोणत्याहि कारणाने असो, हिंदंविरुद्ध खेळतांना फासा मुसलमानांना हवें तें दान नेमकें देतो) हे डॉ. आंबेडकरांचे इषारेवजा म्हणणे बव्हंशी खरे आहे; पण, 7 जरासंधाच्या हाडांचा फासा भीम समोर येऊन बसतांच च-.. मग कामी ठरला. ही पौराणिक गोष्टहि काही कमी सूचक नाही. ' संघटित हिंदुसमाज आपली भीमशक्ति एकत्र करील आणि डॉ. आंबेडकरांच्या भीमपराक्रमा 'चेंहि तिला पाठबळ मिळेल तर, आजवर मुसलमानांना अनुकूल दान देणारा फासा या प्रसंगी व यापुढील सर्व प्रसंगी मुसलमानांवर उलटलाच पाहिजे! ... Thoughts on Pakistan, p. 61..... ...'