पान:पाकिस्तानचे संकट.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाकिस्तानचे संकट या दोन संस्थानांचें क्षेत्रफळ ८०,४१० चौरस मैल आहे. १९३१च्या शिरगणतीप्रमाणे येथील लोकवस्ती ८,६८,६१७ आहे. या प्रांताला अद्याप स्वायत्तता मिळाली नाही. ती मिळावी अशी मुसलमानांची मागणी आहे. सध्यां ब्रिटिश हिंदुस्थानांत जे अकरा स्वायत्त प्रांत आहेत त्यांच्यांत समतोलपणा काडीचाही नाही. क्षेत्रफळ, लोकसंख्या, उत्पन्न या सर्वांचा " विचार करून, प्रांतांतील लोकांच्या प्रांतिक गरजा भागण्याच्या दृष्टीने प्रांत स्वयंपूर्ण होण्यासारखा आहे की नाही याचा कांहींहि विचार न करता, प्रांतांची अव्यवस्थित बोचकी बांधण्यात आलेली आहेत. प्रांतांची शास्त्रशुद्ध रचना कोणत्या तत्त्वांवर व्हावी हे एकदां ठरावे लागेल. या अकरा प्रांतांसंबंधोंची महत्त्वाची माहिती एका कोष्टकांत समाविष्ट केली म्हणजे प्रांतांमधील विषमता बुद्धीला सहज पटेल; म्हणून ते कोष्टक पृ. ११०-१११ वर मांडून दाखविले आहे. देशी संस्थानांमध्येहि अशीच विषमता आहे.

  • मंगलप्रसंगी भेट देण्याच्या वस्ती ०००० * सर्व मेकची फाऊन्टन पेन्स व ..... * हरत-हेची स्टेशनरी .. .

मिळण्याचे पुण्यातील प्रमुख ठिकाण 7 व्ही. जी. गोखले आणि कं. ० ० ० 155 स्थापना १९२८ ___मुख्य दुकान शाखा 7 फरासखाना हौदासमोर-सरस्वतीविलास लक्ष्मीरोड