पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ भविष्यवादी होशेहा, योएल, आमोस आणि ओबद्या. [प्रक० ७९ धिकारी ह्मणविले. तरी अहाज्याची बहीण यहोशेबा इने अहाज्याचा धाकटा पुत्र योवाश याला वांचवून परमेश्वराच्या मंदिरांत सहा वर्षे लप- विले. मग सातव्या वर्षी यहोशेबाचा नवरा यहोयादा जो मुख्य याजक त्याने लोकांचे मुख्य व लेवी यांस मंदिरांत एकत्र मिळवून राजाचा पुत्र त्यांस दाखविला. तेव्हां त्यांनी त्याला मुगुट घालून झटले: “राजा वांचो!" लोकांचा हा शब्द ऐकून अथल्या जवळ आली आणि हे पाहून "फितूर, फितूर!" असी अरोळी केली. मग लोकांचे मुख्य यांनी तिला देवाच्या मंदिरांतून नेऊन बाहेर जिवे मारिले. नंतर देशांतल्या सर्व लो- कांस आनंद झाला व नगर शांत झाले. प्रक० ७९. भविष्यवादी होशेहा, योएल, आमोस आणि ओबद्या. उपोद्घात. ऊजीया यहूदाचा राजा असतां आणि यरोबाम इला- एलाचा राजा असतां (ईसवी सनाच्या ८०० वर्षांपूर्वी) होशहा, योएल, आमोस, ओबद्या, योना, मीखा आणि यशाया हे भविष्यवादी जसे राजांच्या तसे लोकांच्याही दुराचरणाविषयी आणि अव्य- वस्थितपणाविषयीं साक्षी द्यावयास प्रसिद्ध झाले. त्यांनी शास्त्र पाळण्याविषयी त्यांस बोध केला, आणि इस्राएल व यहूदा यांजवर जी देवापासून न्यायाची शासने येणार त्यांविषयी त्यांनी भविष्यवचन सांगितले. आणि दावीदाचा पुत्र जो मशीहा (खीस्त) तो येऊन आमचे संकट दूर करून सर्वकाळचे तारण स्थापील याविषयी त्यांनीवचने देऊन यहदा व इस्राएल यांतले जे खरे भक्त होते त्यांचे समाधान केले अणखी त्यांच्याच काळासाठी केवळ नाही, पण सर्वकाळपर्यंत राहून भक्तांचा भाव स्थिर व्हावा आणि परमेश्वराच्या मार्गाविषयीं बोध असावा, ह्मणून त्यांनी आपल्या भविष्यवादांचे मुख्य वेचे ग्रंथरूप लिहून ठेविले आहेत; ह्या व दुसन्या भविष्यवाद्यांविषयी पेतर जो प्रेषित तो ह्मणतो: "भविष्यवाद मनुष्यांच्या इच्छेने कधी झाला नाही, तर देवाचे पवित्र मनुष्य पवित्र आत्म्याकडून प्रेरित असून बोल- ले" २ पेतर १,२१.