पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० अहाबाच्या घराण्यावर शासन. [प्रक० ७८ प्रभूने अरामी सैन्यांस रथांचा, घोड्यांचा व मोच्या सैन्याचा आवाज ऐकविला. तेव्हां ते एकमेकांसी बोलले: “पाहा, इस्राएलाच्या राजाने आह्मावरयायाला हित्त्यांचे व मिसऱ्यांचे राजे मोल ठरवून आह्मावर ठेविले आहेत." तेव्हां ते उठून आपली छावणी तसीच टाकून पळाले. मग सकाळी चार कोडी माणसे भुकेने मरूं नये ह्मणून शोमरोनांतून अरामा- च्या छावणीकडे गेली. आणि छावणी रिकामी यांस सांपडून त्यांनी नगरांत परत जाऊन ते कळविले. मग सर्व लोकांनी निघून अराम्यांची छावणी लुटली. तेव्हां शेकेलाला शेरभर सपीट मिळाले. आणि ज्या सरदा- राच्या हातावर राजा टेकत होता त्याला वेसींत (गर्दी होऊन) लोकांनी तुडविले आणि तो मेला. प्रक० ७८. अहाबाच्या घराण्यावर शासन. (२ राजे ८-११.) १. यहदा राज्यांत यहोशाफाट याच्या मागे त्याचा पुत्र यहोरामराजा झाला. तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गाने चालला, कां तर अहाबा- ची कन्या त्याची बायको होती. तरी परमेश्वराने आपला सेवक दावाद याकरितां यहूदाचा नाश करायाला इच्छिले नाही. यहोरामाच्या ठिकाणी त्याचा पुत्र अहज्या राजा झाला. तोही अहाबाच्या घराण्या- च्या मार्गाने चालला, कां की तो अहाबाचा नातू होता. आणि यहदाचा राजा अहाज्या हा (आपला मामा) योराम जो इस्राएलाचा राजा याबरोबर अरामांतील हजाएल यासी लढायास जाऊन त्यांनी गि- लातांतील रामोथ नामें नगर वेढिले. अराम्यांनी तर त्याला मारून जे घाव केले त्यांपासून बरे व्हावयास तो इजेलांत परत आला. मग यहूदाचा राजा अहाज्या योराम राजाचा समाचार घ्यायाला खाली इज्नेलांत गेला. २. तेव्हां अलीशा याने भविष्यवाद्यांच्या पुत्रांतील एकाला रामोथास सैन्यांतील सरदार येहू याकडे पाठविले. तेथे गेल्यावर त्याने तेलाची कुपी घेऊन येहूच्या मस्तकावर ओतून मटले : "परमेश्वर ह्मणतो, म्या तुला आपल्या लोकांवर राज्य करायास अभिषेक केला. तूं अहाब याच्या घराण्याला मारून माझे सेवक जे भविष्यवादी यांच्या रक्ताचा सूड ईज- बेलीजवळून घे आणि अहाबाच्या सर्व घराण्याचा नाश कर." तेव्हां