पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० ७८] अहाबाच्या घराण्यावर शासन. १८१ यांनी करणा वाजवून झटले : “येहू राजा झाला." मग येहू योरामावर इनेलाकडे चालला. तेव्हां पाहरेकऱ्याने इज्जेलांतल्या बुरुजावरून थवा येतां पाहून कळविले. तेव्हां योरामाने स्वार पाठवून त्याने "शांति आहे काय?" असे विचारले.परंतु येहूने त्याला व त्याच्यानंतर दुसऱ्याही स्वाराला आपल्या पासीं ठेवून चालला. मग योराम अहाज्याबरोबर निघून येहूला भेटा- यास गेला आणि नाबोथ इनेलकर याच्या शेतांत यांची गांठ पडली. तेव्हां योरामाने मटले : “येह, शांति आहे काय ?" तो बोलला : "तुझी आई ईजबेल इचे व्यभिचार व इचीं गारुडे एवढी आहेत तोपर्यंत शांति कसची?" तेव्हां योराम पळाला. परंतु येहूने आकर्ण धनुष्य ओढून यो- रामाच्या हृदयांतून तीर मारला आणि तो मेला. तेव्हां त्यांनी त्याचा मर्दा उचलून नाबोथाच्या शेतांत टाकला. अहाज्याही पळाला, परंतु यहने त्याच्या पाठीस लागून त्यालाही जिवे मारिले. मग त्याच्या चाक- रांनी त्याला यरूशलेमास नेऊन पुरिले. ____३. आणि येहू इज्जेलास आला, तेव्हां ईजबेलीने आपणास शंगारून खिडकीतून डोकाविले. तेव्हां "तिला खाली टाका" असी दोघांस येहने आज्ञा केल्यावरून त्यांनी तिला खाली टाकले. नंतर तिला परा- याला आले तो तिची करोटी, पाय व हाताचे पंजे यांखेरीज तिचे कांहीं सांपडले नाही. नंतर येहूने शोमरोनास जाऊन सर्व लोक मिळ- वन यांस मटले : "अहाबाने बालाची सेवा थोडी केली, येह त्याची फार सेवा करील." असे बोलून “बालाजवळ मोठा यज्ञ करायाचा आहे!" त्याने जाहीर केले. मग सर्व इस्राएलांतून बालाचे भजणारे सर्व आले, आणि ते बालाच्या देवळांत यज्ञ करायास गेले असतां त्याने त्यांस तरवारीने जिवे मारण्याची आज्ञा केली. आणि बालाची मर्ती फोडून व त्याचे घर मोडून इस्राएलांतून बाल नाहींसा केला. परंतु यराबामाने जी पापे केली, ह्मणजे दान व बेथेल एथली सोन्याची वासरें याने सोडली नाहीत, ह्मणून "तुझे संतान केवळ चौथ्या पिढीपर्यंत इस्ला- एलाच्या राजासनावर बसतील असे परमेश्वराने येहूला सांगितले. आणि अहाज्याची आई अथल्या (प्रक०७५ क ०२.) इने आपला पत्र मेला असे पाहून राजकुळांतल्या सवाचा नाश करून आपणास राज्या-