Jump to content

पान:परोपकार.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
३७
कराराची मर्यादा

मेकांपासून फार दूरदूर राहणारे असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपसांत चढाओढ लागत नाही व त्यामळे गरीब कुळांचे फार नकसान होते. कोणत्याही प्रकारचे करार करून घेण्याला व देण्याला जमीनदार आणि कुळे ह्यांना जरी पूर्ण मोकळीक असते, तरा अनेक प्रसंगी कुळाचे हातपाय बहुतेक बांधल्यासारखेच असतात. गरीबीमुळे व अज्ञानामुळे, देशांतरास जाऊन काही तरी धंदा करून पोट भरण्याची त्यांच्या अंगी ताकद नसते; तेव्हां जमीनदारास इष्ट असेल तशा प्रकारचा करार लिहून देऊन कसाबसा अर्धपोटीं राहून तरी निर्वाह चालविणे त्यांस भाग पडते. नाहीतर मुळीच उपाशी राहून मरण्याची पाळी यावयाची, अशी त्यांची स्थिति असते. अशा प्रसंगी जमीनदार सारासार विचार करणारा व थोडाबहुत दयाशील असेल तर कळांस त्यांच्या श्र. माचा योग्य मोबदला मिळण्याचा संभव असतो. नाहीतर त्या बिचाऱ्या कुळांच्या अंगचें कितीही रक्त शोषून घेतले तरी त्यांना हूं का चू करिता यावयचे नाही. न्यायदेवतेकडून ज्यावेळी न्याय मिळेनासा होतो त्यावेळी परोपकाराच्या स्फूर्तीनेच तो मिळाला तर मिळण्याचा संभव असतो.
 शहरापासून दूर अंतरावरच्या खेडेगांवांतील गरीब लोकांची पैशाच्या संबंधाची स्थिति वरच्यासारखीच असते. जवळपास जो एकादा सावकार असेल त्याच्यापासून तो सांगेल तें व्याज कबूल करून अडचणीचे वेळी पैसा काढावा व सर्व जन्म त्याचे व्याज खंडीत बसावे. मुद्दल रकमेच्या अनेक पटीने जरी व्याज घशांत आले असले तरी सावकाराची मुद्दलं रकम कायमच असते. कायद्याच्या दृष्टीने जरी हे कराराप्रमाणे वर्तन असले, तरी सारासार विचाराच्या दृष्टीने ही शुद्ध लूट होय. गरीब लोकांस शिक्षण देणे व समाजाची नीतिमत्ता वादविण्यासाठी यत्न करणे हेच अशा प्रकारचे कायदेशीर जुलम नाहीसे करण्यास उपाय होत.
 कधीकधी ज्या गोष्टी स्वाभाविकपणे घडून येतील अशा अजमासावर करार केला असतो त्या गोष्टी घडून येत नाहीत, किंवा एकादें अकल्पित कारण उपस्थित होऊन केलेला करार तडीस नेणे अशक्य होते. असे झाले असतां पुष्कळ वेळां सारासार विचार करून सवलत देणे भाग पडते, व तशी संवलत पुष्कळ लोक कधीकधीं स्वहिताच्या दृष्टीने व कधीकधी परहिताच्या दृष्टीने देतातही. साधारण मानाने सालाबादप्रमाणे पाऊस पड़ेलं अशा अजमासावर काही खंड देण्याचे कबूल करून एकाद्याने जमिनीची लागवड केली