पान:पद्य-गुच्छ.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जि. प्रम एण कै. म. म. दा. पोतदार ... दाखल अंक 14286 free 861. Ket F861 "तारो 62-3-43 ' पद्यगुच्छ ' हें माझें प्रस्तुतचें पुस्तक ' गद्यगुच्छ ' या माझ्या दुसऱ्या एका पुस्तकाचें छोटे भावड आहे. पद्यगुच्छांतील पहिल्या पद्यांतच या दोन वाङमय प्रकारांचे गुण मी वर्णिले आहेत. त्यांपैकी 'पद्याचे' म्हणून सांगितलेले गुण या गुच्छांतील पद्यांतून कितपत आढळतात हें बारीक नजरेनें पाहण्याची इच्छा वाचकांना सहजच होईल. आणि तशी ती झाली तर मलाहि बरें वाटेल. माझे मित्र प्रो. माटे यांच्या मतें " वाङमय लिहिणारानें यापुढें पद्याच्या भानगडीत न पडतां, त्याला जें काय लिहावयाचें तें सर्व गद्यांतच लिहावें. " केवळ व्यवहार, मतप्रसार किंवा शुद्ध ज्ञानप्रसार यांच्या पुरतें माटे यांचें म्हणणें खरें आहे. आणि हे दोन हेतू मनांत ठेवूनच जो लिहील तो पद्यरचनेच्या भानगडीत पडणार नाहीं. पण कलाविलासाचा आनंद सेवण्याकरिता म्हणूनहि कांहीं वाङमय लिहिलें जातें; व त्याला पद्याचा प्रकार हैं एक फार सोईचें साधन होऊं शकतें. आतां कलाविलास हा शब्द थोडा जाडा भरदार होतो; तो झेपण्यासारखी कांहीं लेखकांची पात्रता खरो- खरच नसते. पण ज्याला कलानिर्मितीचा विलास यशस्वीपणे करतां येणार नाहीं अशा लेखकालाहि 'मी स्वतःची करमणूक करतों' असें तरी निदान म्हणण्याचा अधिकार खचित असतो स्वत: मीहि या पद्यरचनेच्या भानगडीत पडतांना करमणुकीहून अधिक उच्च हेतूची हाव कधींच मनांत धरली नव्हती. या पद्य- गुच्छांतील पुष्कळशा कविता केवळ वेळ घालविण्याचें एक साधन म्हणूनच मी लिहिल्या आहेत. केव्हां ठरीव कार्यक्रम संपून गेल्यामुळे उरल्या वेळेचें काय करावें हें समजत नाहीसें झालें आहे; केव्हां आजारांतून उठून बरा होतांना घरच्या घरी बसून राहावें लागलें आहे; केव्हां विलायतेसारख्या लांबच्या प्रवा- सांत इतरांच्या ख्यालीखुशालीत समरस होतां येत नाहीं व समुद्राकडे एकसारखें पाहात बसण्याचा कंटाळा आला आहे; अशासारख्या स्थितींत रचलेल्या पद्यांत करमणूक होऊन पुन्हा मनः प्रसन्नता लाभावी याहून दुसरा हेतु 5. म. म. द. वा. पोतदा ग्रंथ संग्रह