________________
थांबवते.) प्रेयसी : एक मिनिटे, मिनीट. काय रे तुम्हा पोरांना स्वतःची खात्री नसते का. एका मुलीवर प्रेम आहे. काय आहे अनेक जणीन नंतर मी असेल वाटतेना म्हणून म्हणल. प्रियकर :कायम जमिनीवर आपट तुला माहिती आहे ना माझ्या विचारांची लिंक तुटली की परत मला शुन्यापासून सुरुवात करावी लागते. कुठे होतो मी. प्रेयसी : एका मुलीवर प्रेप्न आहे. प्रियकर : हे सही पकडे है। (दोघे हासतात) तर तू आस सांगायच मला फोन करायचा कि मी लगेच इकडून गाड्या करून माणसं घेवून येणार. प्रेयसी : मग माझ्याकडची आणि तुझ्याकडची माणसे अशी दोघांची हाणामारी गांधी मैदानावर लागणार आणि सर्व सातारकर ती बघायला जमणार. प्रियकर : आयच्या गावात तु मलासारखी जमिनीवर का आपटतेस ? प्रेयसी : कारण स्वप्न आणि सत्यात फरक असतो मला माहित नाही. माझे वडिल या सगळ्यावर काय रिअॅक्ट होतील. पण डोन्ट वरी. आय विल मॅनेज. प्रियकर : यार खरच जेव्हा तू त्या इंग्लिश पिच्चर मधल्या सारख बोलतीस ना तेव्हा मला तू त्या टायटॅनिक मधल्या डेअरिंग करून पळून जाणारी नटी आहे ना काय बरं... हा रोज तशी वाटतेस. प्रेयसी : आणि जेव्हा तू असा बोलतोस ना तेव्हा तू फॅन्डीतल्या जब्या सारखा वाटतोस. (जोरात । हेसायला लागते.) प्रियकर : (हा शांत) करा चेष्टा करा. प्रेयसी : चिडू नकोरे गम्मत केली थोडीशी. प्रियकर :(थोड्या वेळ शांत बसतात. प्रियकर एकटक नदीकडे बघत) माणसांचे स्वभाव पण गूढ