पान:नीतिज्ञानप्रभा.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. हे परमेश्वरा, ज्या नीतीच्या आदितत्वावर जगाचे सौख्य अवलंबून आहे, त्यांचा प्रसार होणे हे प्राणिमात्रांच दुःख दूर होणेच होय. आर्यदेशामध्ये नीतीची तत्वें व तत्वज्ञानाची भांडारे थोडी आहेत असे नाही; परंतु ती पडली गीर्वाणभाषेमध्ये व प्रसार पडला प्राकृताचा. कुपांत जल आहे; पण दोरी जवळ नाही तर तलावाच्या पाण्याचा सहज उपयोग घेतला जातो. गीर्वाण भाषेची तत्वे इतकी खोल, गंभीर व मार्मिक आहेत की, ती समजण्याची शक्ति आज क्वचित् स्थळी महान् योव्यांचेच अंगी आहे. एसियाटिक सोसायटीला देखील ती न समजल्यामुळे बौध्यतत्वे हल्ली मान्य धरण्यांत आली आहेत. थोडक्यांत पुष्कळ विषयासंबंधी पूर्ण भरलेले सरळ व कारणासह मुख्यतो प्राथमिक शिक्षणास उपयुक्त होऊ शकेल, व तसेच आबालवृद्ध व स्त्रियांनांही उपयुक्त मनोरंजक होऊन सर्वमान्य व्हावे ह्या हेतूने ह्या पुस्तकाची रचना करण्यांत आली आहे. हे गवाने सांगत नाही; परंतु बारकाईने व मननपूर्वक ह्या पुस्तकाचें वाचन करण्यांत आले तर त्या त्या विषयाची सर्व तत्वे ह्यांत दृष्टीगोचर होतील. शाळा खात्यांत व कुलीन स्त्रिपुरुषांस वाचनास योग्य होण्यास्तव ह्यांत रा० सा० शंकर मोरो रानडे बी. ए. , रा० बा. हरगोविंद द्वारकादास कांटावाला डायरेक्टर, रा० सा० गणेश बळवंत बी. ए. एल्. एल्. बी. वगैरे गृहस्थांच्या सूचनेवरून खा