पान:निवडक अंतर्नाद.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किंवा नाही याची शंका होती, पण त्यासाठी प्रवासाला सुरुवात करणे तर आवश्यक होते. कथेचा शेवट तर आधी ठरलेलाच होता. हा अनुभव होता कुटुंबापासून दूर राहणाऱ्या पतीचा, पण मी त्याला पत्नीच्या दृष्टिकोनातून दाखवायचे ठरविले. कारण एकमेकांपासून दूर राहण्याचे दुःख दोघांचेही होते. वाट्याला येणारे चारदोन सोनेरी क्षण जगत, आठवत, जीवनातल्या धकाधकीत न हरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या साऱ्यांचीच ती वेदना होती. मी या अनुभवाच्या केंद्रस्थानी त्या गृहिणीला घेतले. पतीच्या गावाला जाऊन नुकतीच ती परत आली आहे. तिच्या मनात अजून त्या सुखद क्षणांची याद ताजी आहे. त्या दिवसातला एकेक प्रसंग तिला आठवतो. तिला वाटते की नवऱ्याचे पत्र यावे. आणि त्याचे पत्र येतेही. तिला जे आठवले तेच तिच्या नवऱ्याने लिहिले होते. मनाच्या तारा जुळल्या असल्या की सारेच जुळते. ह्या पत्राच्या शेवटी तो तिला त्याचा अनुभव लिहून कळवतो. ठश्याचा जणू तिने दिलेला आनंदाचा ठेवा तो तिला परत करीत असतो. एकमेकांच्या अस्तित्वाचा ठसा दोघांच्याही जीवनावर उमटलेला असतो. रेणू शाळेतून आली. त्यावेळी अगदी वैतागून गेली होती. सहामाही परीक्षा होऊन बरेच दिवस झाले तरी अजून पेपर तपासणे झाले नव्हते. पोरांनी सारखा 'मार्क सांगा' असा धोशा लावला होता, कशी कुणास ठाऊक, हेडमास्तरांपर्यंतही भुणभुण पोहोचली होती. आज शाळा सुटल्यावर त्यांनी तिला बोलावून घेतले होते - "तुमचे पेपर्स अजून तपासून झाले नाहीत म्हणे " "हो..." “का?” ठसा विजय पाडळकर या प्रश्नाला उत्तर होते, पण सरांना ते पटण्यासारखे नव्हते. ती गप्प राहिली. "मग? केव्हा देता पेपर्स?" “देते दोन-तीन दिवसांत ती कसाबसा प्रसंग निभावून नेण्यासाठी म्हणाली. नंतर धर्मापुरीकरांनी त्यांची कथा मला वाचायला दिली. त्यांनी अर्थातच ह्या कथाबीजाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. ठश्याच्या दर्शनाने त्यांच्या नायकाला आपल्या पत्नीची असंख्य रूपे आठवतात. सहजीवनाचे ते सुंदर, लोभस क्षण त्याच्या मनात पिंगा घालू लागतात. छोट्या छोट्या ठिपक्यांतून रांगोळी उमलावी तसे लहान लहान प्रसंगांतून तिचे चित्र त्याच्या मनात तयार होते. कधी एखादा कटाक्ष, कधी एखादे खट्याळ हसू, एखादी खूप ओळखीची झालेली लकब प्रत्येक घटनेतला तिचा सहभाग त्याला उत्कटतेने जाणवतो आणि जाणवते की ठसा फक्त पिठावरच उमटलेला नाही. साऱ्या अस्तित्वावरच उमटला आहे. शाळेचे काम आजकाल भयंकर वाढले होते. शिवाय नांदेड जिल्हा संपूर्ण साक्षर करण्याची मोहीम निघाली होती ना! कुठलीही अशी सरकारी टूम निघाली की, आधी वेठीला धरले जातात ते शिक्षकच गावातल्या अशिक्षित बायकांच्या याद्या तयार करायच्या, त्यांना शिकायला पाठवा म्हणून त्यांच्या घरच्यांच्या मनधरण्या करायच्या, रात्री त्यांचे वर्ग घ्यायचे, त्याचे रिपोर्ट तयार करायचे... एक ना दोन! यातच आठवडा निघून जाई. शनिवारी मात्र रेणूचा पाय गावी अशा या दोन कथा. त्यांची शैली, त्यांची रचना यांतील साम्य व भेदाचे आणखी विश्लेषण करता येईल. पण इथे मला तो प्रयत्न करायचा नाही. शेवटी प्रत्येकाचा 'अंदाजे बयां औरच असतो. एकाच झाडावरली दोन फुले जशी वेगळी असतात, तशा आणि तितक्याच ह्या कथा वेगळ्या आहेत. जणू एकाच ठिकाणावरून निघालेल्या दोन पायवाटा या वाटांवरून पुढला प्रवास आता वाचकांनी करावयाचा आहे. ठरत नाही. लग्नाआधीपासून इथे माहेरीच ती नोकरी करते आहे. रमेशच्या सारख्या कुठे कुठे बदल्या व्हायच्या. आता तो गंगाखेडला असतो. रेणूचे सासर नांदेडला, तिथे बंटीला इंग्रजी शाळेत घातलेले. असे तीन ठिकाणी तिघेजण शनिवारी रविवारी तिघेही एकत्र नांदेडला जमत. पुन्हा सोमवारी सकाळी दोन दिशांना दोघे पांगत. अशाने पेपर कधी तपासून होणार ? अर्थात हे सरांना सांगून काय फायदा? एकदा तिने पुसटसा केव्हातरी याचा उल्लेख केला होता. तेव्हा हेडमास्तर म्हणाले होते, "हे सगळे खरे हो. पण फॅमिली प्रॉब्लेम कुणाला नसतात? सगळीकडे पळसाला पाने तीन आता माझ्याकडे बघा माझ्या डोक्याला काय कमी ताप आहे? ऑफिसपेक्षा घरचा दुप्पट ! पण त्यामुळे कामावर परिणाम व्हायला नको, " घरी आल्या आल्या कोनाड्यातला पेपरचा गठ्ठा तिला दिसला व तिच्या कपाळावर आठ्या पडल्या पायातल्या चपला • दाराशी काढून ती घरात आली. हातातली पर्स टेबलावर टाकली आणि पदराने वारा घेत ती पलंगावर टेकली. ती आल्याचे आईने खिडकीतून पाहिले होते, ती आतून म्हणाली, "रेणू, तोंड हात-पाय धुवून घे, चह्य ठेवतेय बघ." रेणू उठली, मोरीत जाऊन तिने थंडगार पाणी हातापायांवर ओतून घेतले. खसखसा तोंड धुतले. स्वयंपाकघरात येऊन बसली. तिच्या समोर चहाचा कप ठेवीत आई म्हणाली, "तुझी दोन पत्रं आलीत बघ,” निवडक अंतर्नाद ९३