पान:निवडक अंतर्नाद.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती. त्याच्या शेजारचा पांढऱ्या कपड्यातला बुटका माणूस चेहऱ्यावर काहीच भाव न दाखवता त्याच्याकडे पहात होता. "माझं नाव नवरे, थोडं बोलायचं होतं. " "या आत" प्रमोद नाईलाजानं म्हणाला. ती दोघं आत आली. प्रमोदच्या आईनं निवडत असलेली गवार पातेल्यात भरली आणि ती आत गेली. माधुरीनं पदराला हात पुसत आतूनच आलेल्या पाहुण्यांकडे एक कटाक्ष टाकला. अपर्णा आणि अभिजितची काहीतरी नेत्रपल्लवी झाली. ती दोघं उठून गॅलरीत गेली. "बसा." "सॉरी हं साहेब, तुम्हाला डिस्टर्ब केलं" कोचावर बसत नवरे म्हणाला, "हे पांडे " पांडेंनी आपल्या खिशातून एक कार्ड काढून प्रमोदकडे दिलं. 'सिद्धीविनायक ज्युवेलर्स' असं त्या कार्डावर छापलेलं ह्येतं, ते वाचून प्रमोदला काहीच अर्थबोध झाला नाही. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं नवरेकडे पाहिलं. "सिद्धीविनायक ज्युवेलर्स हे नाव तुम्ही ऐकलं असेलच. ह्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर त्यांची नवी बँच चालू होतेय.” "बरं, मग?" "मी सिद्धीविनायक ज्युवेलर्ससाठी काम करतो,” पांडे म्हणाले. त्यांच्या मराठी उच्चारावर हिंदीची छाप होती, "तुमच्या खालच्या मजल्यावरची जागा आम्ही घेतलीय. तिथं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. और दो तीन महिनोंमे दुकान शुरू हो जायेगी.” प्रमोदला आठवलं. खालच्या माळ्यावरचे दामले नुकतेच जागा सोडून गेले होते. तिथं नवीन दुकान येणार होतं. ते ह्या ज्युवेलर्सचं नाही का? खरंच की, “ती जागा आम्हाला पुरी पडत नाही. आहाला आणखी जागा हवी आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. म्हणजे असं की ही तुमची रहाती जागा तुम्ही आम्हाला द्यायची, आम्ही तुम्हाला दुसरी बेहतर जागा देऊ आणि वर बढ़िया कॉम्पेन्सेशन देऊ,” पांडेनं थोडक्यात सांगितलं. "काही गरज नाही. मला तुमची बढ़िया जागा नको आणि कॉम्पेन्सेशनही नको, मी आहे इथं ठीक आहे.” "आमची ऑफर ऐकून तर घ्या, ” नवरेंनी चिकाटी सोडली नाही. "मला जागा सोडायची नाही. तुम्ही जाऊ शकता.” प्रमोद उठला. "अशी डोक्यात एकदम राख काय घालून घेता साहेब, " नवरे म्हणाला. कॉम्पेन्सेशन पन्नासच्या वर असेल हे लक्षात घ्या. " "म्हणजे ही मध्यवर्ती जागा सोडून मी ठाणे-डोंबिवलीला दुसऱ्या कुठल्यातरी जागेत रहायला जायचं आणि त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून तुम्ही मला वर फक्त पन्नास हजार देणार ? काही गरज नाही. आ अॅम नॉट इंटरेस्टेड" नवरे गालातल्या गालात हसला. "पन्नास हजार नाही साहेब. ८४ निवडक अंतर्नाद पन्नास लाख! अर्धा कोटी! अर्थात नव्या जागेची किंमत धरून,” "पन्नास ला..... प्रमोदचा आ विस्फारलेला तसाच राहिला. आजकाल ह्या मेनरोडवरच्या जागांना सोन्याचं मोल आलं आहे, हे त्याला माहीत होतं, जागांच्या किंमती अफाट झाल्या आहेत ह्याची कल्पना होती. पूर्वी ज्या सहजतेनं लोक आठ-दहा हजार म्हणत तितक्या सहजपणे आज आठ दहा लाखाच्या गप्पा होताना त्यानं ऐकल्या होत्या. पण तरीही ? इतके पैसे ? पन्नास लाख? " बघा साहेब, तुम्ही विचार करा. आम्हाला आजच तुमचं उत्तर हवं असं नाही. तुमच्या घरातल्या माणसांना विचारा, शेजाऱ्याापाजाऱ्यांचा सल्ला घ्या. हवं तर एखाद्या वकिलाला विचारा. मग आम्हाला सांगा." नवरे म्हणाला, "आणि साहेब,” पांडे म्हणाला. "आमचा व्यवहार एकदम साफ असतो. दामलेसाहेबांना विचारून खात्री करून घ्या, त्यांचा हा नवा फोन नंबर, " पांडेनी प्रमोदच्या हातात एक कागदाचा चिटोरा दिला. प्रमोदच्या चेहऱ्यावरचे भाव पांडे आणि नवरे निरखत होते. पन्नास लाखाच्या आकड्यानं योग्य तो परिणाम साधला.... "कोणाशी बोलायची मला गरज वाटत नाही. मला नोकरीसाठी चर्चगेटला इथून थेट बस मिळते. बायकोची नोकरीची जागाही जवळच आहे. मुलांची शाळा-कॉलेजिस दहा मिनिटाच्या अंतरावर आहेत. " डोंगरे हसला, म्हणाला, "तुम्ही स्वतःच्या गाडीनं ऑफीसला जाऊ शकाल आता, देशमानेसाहेब, वहिनीसाहेबाना नोकरी करायचीच गरज रहाणार नाही. आणि मुलांचं म्हणाल तर त्यांना जवळच्या शाळा कॉलेजात प्रवेश मिळू शकतो. लागलं तर आम्ही मदत करू. आमच्या तिवारीसाहेबांच्या खूप ओळखी आहेत.' >> " तरीही... नाही. नको आम्हाला तुमचं प्रपोजल, आम्ही इथं आहोत तेच ठीक आहोत." प्रमोद म्हणाला खरा पण त्याच्या आवाजात ठामपणा नव्हता. त्या दोघांनाही ते जाणवलं. "सोच विचार करून मग सांगा साहेब पुढच्या हप्त्यात सांगितलं तरी चालेल," पांडे म्हणाले. "पण ज्यादा देर करू नका. दोन बिल्डिंग यकून शंकरनिवास आहे. तिथं पण आमची बोलणी चालू आहेत. आता ती जागा जरा लांब पडेल हे खरं, पण चालेल. तुमची मिळाली तर जास्त सोयीचं होईल. बघा फार तर रकमेत थोडं कमीजास्त करू, आमची तयारी आहे.” "पांडेसाब, उन्हें थोडा सोचने दीजिये. फिर बात करेंगे, बरं मग आम्ही निघतो साहेब. पुढच्या आठवड्यात भेटू" नवरे उठले. ते लोक गेले तसे प्रमोदचे कुटुंबीय त्याच्याभोवती गोळा झाले. सगळ्यांच्या कानावर बोलणी पडलेलीच होती. "काय करायचं ठरवलंय बाबा तुम्ही?” अभिजितने सरळ केला. प्रश्न