पान:निवडक अंतर्नाद.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढे अफगाणिस्तानात युद्धाचा भडका उडाला. तिथे तालीबानचं राज्य आलं. नजीबला गाडीमागे बांधून रस्त्यात फरफटत नेत ठार मारण्यात आलं. त्याच्या मृतदेहाचे धिंडवडे निघाले. लिंग कापून त्याचा मृतदेह झाडाला लटकवला गेला. सय्यदच्या काळजाचं पाणी पाणी झालं. नजीब हा त्याच्या वडलांचा दोस्त, लहानपणी नजीबच्या हवेलीवर खेळायला गेलेला हा. त्याचा पुतण्या याचा खास दोस्त, नजीबला भर रस्त्यात फाशी दिल्याची बातमी आली आणि विस्फारित नेत्रांनी सय्यद पाहात राहिला. बातम्यांतले फोटो पाहात राहिला, अफगाणिस्तानात रक्तरंजित क्रांती झाली. मूलतत्त्ववाद्यांचं सरकार आलं. नव्या सरकारचं आणि भारत सरकारचं सूत जुळेना. जुन्या सरकारचे कारभारी काही दिवस दिल्लीच्या आश्रयाला राहिले, पण त्यांनाही पुढे देश सोडावाच लागला, सय्यदचे आई-वडील तडकाफडकी दिल्ली सोडून गेले. त्याला भेटूच न शकता! ते कुठे आहेत वगैरे काहीच बरेच दिवस कळेना, फोन, पत्रं काहीच नाही. मायभूमीची वाताहत, सतत युद्ध, आई बाप गायब, विधवा बहीण जर्मनीत का पोलंडमध्ये का फ्रान्समध्ये काही पत्ता नाही. ह्य इथे पुण्यात, इंग्रजी आणि मेडिकलच्या अभ्यासक्रमाशी झगडतोय. पण सय्यद भलताच चिवट आणि खंबीर या असाधारण परिस्थितीबद्दल चकार शब्द कधी काढायचा नाही. मी विचारलं तर चार दोन शब्दांची त्रोटक उत्तरं यायची. शेवटी मी नाद सोडून दिला. सिनेमाला गेलो एकदा, मीरा नायरचा 'सलाम बॉम्बे', अंगावर येणारा सिनेमा घरातून परांगदा झालेलं ते पोरगं, त्याचं नाव हरवतं, गाव हरवतं आणि मुंबईत मिळेल ते काम करून त्याचा जगण्याचा झगडा सुरू होतो. ते पोरगं चहाच्या गाड्यावर हरकाम्या म्हणून कामाला लागतं, त्याला कोणी नाव विचारत नाही की नावानं ह्यक मारत नाही. 'ए च्या पाव' हेच त्याचं नाव बनतं. एकदा पोस्ट ऑफिस पाहून त्याला घरी पत्र लिहायची उबळ येते. लेखनिकासमोर बसून तो मोठ्या उमेदीने मजकूर तर सांगतो, पण पत्ता विचारल्यावर म्हणतो, 'रामपूर', कुठलं रामपूर ?' लेखनिक खेकसतो. हा कोरा, 'पत्ता माहीत नाही तर पत्र लिहून ययम बरबाद का केला माझा?' त्याच्या डोळ्यांत पाणी. 'अरे कुठलं रामपूर? भारतात प्रत्येक जिल्ह्यात रामपूर असेल...' हा गप्प, तो लेखनिक पुन्हा पुन्हा विचारत राहातो, हा हिरमुसला हिरमुसला होत जातो. मुसमुसत मुसमुसत, विझत - विझत जातो. शेवटी वैतागून तो लेखनिक त्या पत्राचा बोळा करून फेकून देतो. कॅमेरा त्या घरंगळणाऱ्या कागदी बोळ्यावर स्थिरावतो आणि ह्या प्रचंड मानवसमूह्यतल्या बेपत्ता माणसांचं एकलेपण आपल्यावर भिरकावून देतो. हे सगळं बघताना शेजारी बसलेला सय्यद अगदी आतून ६४ निवडक अंतर्नाद हलल्याचं मलासुद्धा जाणवलं. त्याला सहनच होईना, उतू येणारे दुःखाचे कढ शेवटी बंध फोडून बाहेर आले. तो गदगदून रडायला लागला. त्याला कसबसा सावरत सांभाळत मी होस्टेलला आणला. चार दिवस सय्यद घुमा एका शब्दानं बोलेना, चौथ्या दिवशी मला म्हणाला, 'चार दिवस झोपलो नाहीये मी. झोपूच शकलेलो नाही. ' मला काय बोलावं हेच सुचेना. पण ह्या भळभळत्या दुःखावर शर्तीली दवा त्याची त्यानीच शोधून काढली होती, त्या दिवशी त्यानी तो सिनेमा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पाहिला. थेटरच्या अंधारात मनसोक्त, मनमोकळं रडला तो त्या दिवशी तो शांत शांत झाला. काळजातल्या दुःखाचा सगळा गाळ एकदाचा उपसला गेला. रक्त वाहातं झालं. इतक्या वर्षांत त्याला कधीही कोणीही घरचं भेटायला आलं नाही की हा कधी सुट्टीत घरी गेला नाही. घर होतंच कुठे? उद्ध्वस्त आणि अस्वस्थ अफगाणिस्तानमधून सारेच पांगलेले, परांगदा झालेले. आलाच तर माझ्याच गावी यायचा, मनसोक्त राहायचा. निघताना होस्टेलच्या रखवालदाराला, आपल्या खर्जातल्या कर्कश आवाजात, फर्ज्या मराठीत सांगायचा, 'गाव्वी ज्वावून यतो!' गावातल्या ब्लड बँकेत आवर्जून रक्तदान करायचा, (केल्यावर न चुकता चक्कर येऊन पडायचा!!) गमतीनं म्हणायचा, "तुझा अल्सेशिअन भॉव भॉव असं ओरडत नसून ‘गलाः गलाः' अशी मलाच हाक मारतोय!” एकदा बॅडमिंटनच्या स्पर्धेचं उद्घाटन त्याच्या हस्ते केलं, तर पठ्ठ्यानं स्पर्धेत भाग घेऊन करंडकच जिंकला की घाटावरच्या कळकट हॉटेलातली चटकदार मिसळ तन्मयतेनं खायचा, पूरग्रस्तांच्या मदतफेरीत झोळी घेऊन फिरायचा, गावच्या शाळेसाठीच्या श्रमदानात खरोखरी श्रमायचा, कृष्णा नदीच्या उत्सवात मनसोक्त ढोल बडवायचा, नदीकाठी घाटावर आम्ही गप्पा ठोकत बसायचो. त्याच्या अफगाण वंशाचा त्याला कोण अभिमान, इराणी, दुराणी, सोमनाथ लुटणारा अब्दाली हे माझ्या इतिहासातले खलनायक त्याचे स्फूर्तिदाते होते. कोणी कोणी भारतावर कधीकधी आणि कितीकिती वेळा स्वाया केल्या; कधीकधी, कसंकसं, कुठेकुठे आणि कायकाय लुटलं; हे सगळं तो साभिमान बडबडत राहायचा, माझा अफगाणिस्तान हा गांधारी, पठाणी व्याज, काबुलीवाला आणि पानिपतापुरता सीमित, इराणी, दुराणी आणि अब्दालीला माझ्याकडे उतारा होता कुठे? पानिपतावरचा पुरता पराभवच मला माहीत. मी आपला त्याच्या फुशारक्या सहन करत बसायचो. लढावू अफगाण जनता कधीही पारतंत्र्यात गेली नाही हेही तो छाती फुगवून सांगायचा. भारतातली जातिसंस्था हा तर त्याच्या टीकेचा आवडीचा विषय. शिवाय भ्रष्टाचार, बेशिस्त, अस्वच्छता, निरक्षरता... टीकेला विषय भरपूर होते त्याच्याकडे, खरी, खोटी, रंजित, अतिरंजित टीका काही वेळा बोचणारी, काही वेळा ओरखडणारी, ओरबाडणारी रक्तरंजित टीका. एके दिवशी मी प्रतिहल्ला करायचं ठरवलं. डायरेक्ट अफगाणी बायकांच्या बुरख्यालाच हात घातला, ही चाल कशी असमानतेची, पुरुषी सत्तेची द्योतक आहे, ह्यामुळे बायकांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन, टी. बी. वगैरे कसा होतो, व्हिटामिन डी कसं कमी पडतं... वगैरे बरंच बरंच बोललो. माझ्या बोलण्याचं त्याला