पान:निवडक अंतर्नाद.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पद्धतशीर सांगता येतात, असे कितीतरी गौरवाचे प्रसंग आत्मचरित्रकारांच्या आयुष्यात घडतात ज्याला तेच फक्त साक्षी असतात. ज्या मास्तरांनी आपल्या रूममध्ये त्यांना मुद्दाम बोलावून शाबासकी दिलेली असते; 'भविष्यात तू खूप नाव कमावणार' म्हणून भाकीत केलेलं असतं ते मास्तरही दिवंगत झालेले असतात, मग काय, मुक्त चित्रकला असते तशी मुक्त आत्मकथनकला मान्यवर नेत्याचं किंवा लोकप्रिय कलावंताचं निधन होतं, तेव्हा आदरांजली वाहताना त्या व्यक्तीला हलकेच दूर माझ्या परिचयाचे असे एक लेखक आहेत. साहित्यात त्यांचं भरीव योगदान आहे, अनेक विषयांत त्यांना गती आहे वगैरे सगळं ठीक आहे. पण हा माणूस त्यांना भेटायला येणाऱ्याचा ताबाच घेतो. समोर बसलेल्याच्या शरीराचं बघता बघता एका भल्या करून आदरणीय वक्ते स्वतःबद्दलचं पुराण कसं लावतात हे मोठ्या कानात रूपांतर होतं. त्या लेखकांचा चेहरा नाहीसा होऊन त्याच्या जागी त्याला बडबडणारे दोन ओठ दिसायला लागतात. समोरच्याचा कान थकतो, पण त्यांचे ओठ थकत नाहीत. आपण पाहत आलोत. दिवंगत व्यक्ती आपल्याला कोठे भेटली, अल्पावधीत आपण तिचे सर्वांत जवळचे मित्र कसे बनून गेलो, अशा वर्णनांनी ही भाषणं भरलेली असतात. श्रद्धांजली वाहण्यासाठी भरवलेल्या प्रत्येक शोकसभेत, त्यानिमित्त लिहिलेल्या मृत्युलेखात दिवंगत व्यक्तीचा आपल्याशी किती घनिष्ट संबंध होता, हे सांगण्याची स्पर्धाच लागलेली असते. का बोलत असतात माणसं असं सारखं स्वत:बद्दल? आपल्याशिवाय जगात दुसरं काही महत्त्वाचं आहे याची त्यांना खरोखरच जाण नसते की काय? की आपले गुणविशेष आपण नाही सांगितले तर ते इतरांना कधीच कळणार नाहीत अशी चिंता त्यांना भेडसावत असते? आपल्यापाशी असलेलं बुद्धिकौशल्य इथल्या आसमंतात दुसऱ्या कोणापाशी नाही, अशी त्यांची खरोखरच समजूत झालेली असते? आणि म्हणून त्यांच्याकडून हा वेडाचार घडतो ? सतत स्वतःच्या हुशारीच्या नि पराक्रमाच्या कहाण्या सांगणारी ही माणसं मूर्ख असतात, असं मात्र म्हणता येत नाही, किंबहुना, या मंडळींत गुणवंत आणि विद्वान लोकही मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्या पराक्रमांची ते वर्णनं करतात ते सर्वच्या सर्व खोटे असतात असंही नाही. तरीपण या मंडळींचा सहवास लोकांना नकोसा होऊन जातो. समोरचा माणूस ऊठसूट स्वतःच्या गुणांचं स्तोत्र गात राहिला तर मित्रकर्तव्यापोटी आपण ते किती ऐकायचं? स्वगुण- प्रशंसेनं आपण समोरच्याला कंटाळा आणत आहोत; केवळ भिडस्तपणामुळे ती व्यक्ती आपल्याला हे तोंडावर सांगत नाही, हे त्यांना कळत कसं नाही? सगळा अवघड प्रकार होऊन जातो. लांबच्या प्रवासाला निघाला असता गाडीतला अपरिचित शेजारी तुम्हांला एखादा शेर सांगतो. त्याला बरं वायवं म्हणून तुम्ही 'बहोत अच्छे' म्हणता. मग 'और एक सुनिये' म्हणून तो दुसरा शेर म्हणून दाखवतो. संकोचानं तुम्ही तो आवडल्याचं दर्शवलंत, की तो थोर शायर आपली शायरीची डायरीच काढतो. एवढ्यावर हे थांबत नाही, कवी म्हणून आपली कशी जडणघडण झाली याची कॉमेंट्री तुम्हांला सुनावली जाते. वयाच्या कितव्या वर्षापासून आपण शेर रचायला सुरुवात केली, शेरांना कुठे कशी दाद मिळाली याचा तपशील पुढं येऊ लागतो, एकाचा आनंद दुसऱ्याची पीडा बनून जाते. पण शायर लोकांना त्याचं काय? सभ्यतेचा गैरफायदा घेऊन आपलंच घोडं पुढं दामटवणारे महाभाग आज दुनियाभर पसरले आहेत. त्यांच्या लेखी ते स्वतः सोडून जन्माला आलेले इतर सर्व हे श्रोते असतात. इतरांच्या मानसिकतेची, आवडीनिवडीची, व्यक्तिगत स्वातंत्र्याची किंचितही पर्वा नसणारे, समोरच्या माणसाच्या ५२ निवडक अंतर्नाद स्वत:बद्दल अखंड बोलणारी ही माणसं अशिक्षित वा अर्धशिक्षित असतात असं समजायचं कारण नाही. त्यांच्या विषयात ती चांगल्यापैकी हुशार असतात. आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उच्च स्थान मिळवलेलं असतं. काहींनी स्वकर्तृत्वावर उद्योग व्यवसायात • नेत्रदीपक यश मिळवलेलं असतं तर काही कलेच्या क्षेत्रात नाव कमावून असतात. आपल्या कर्तृत्वाचे ढोल आपणच वाजवू नयेत, आपल्या गुणांचे पोवाडे आपणच गाऊ नयेत, आणि त्यासाठी दुसऱ्याचा अवकाश तर अजिबात वापरू नये, हे तर साधं शहाणपण आहे या शहाण्या मंडळींपाशी एवढं मूलभूत शहाणपण नसावं ही आश्चर्याची गोष्ट आहे आपल्याविषयी आत्मीयता असावी; आपल्या कलागुणांविषयी सार्थ अभिमान असावा. आपणही कोणीतरी महत्त्वाचे आहोत, ही जाणीव मनात असावी. हाती घेतलेल्या कामांना आत्मविश्वासाची जोड मिळण्यासाठी हे आवश्यक आहे स्वतःविषयी तिरस्कार असणाऱ्याचं मन आत्महत्येकडे झुकायचा संभव अधिक असतो. मानसिक संतुलन राखण्यासाठी आपल्याविषयी आपुलकी वाटणं गरजेचं आहे यात शंका नाही. गडबड सुरू होते ती आपल्याविषयीच्या आपलेपणाची डिग्री वाढल्यावर, नोकरी किंवा पदोन्नतीसाठी द्याव्या लागणाऱ्या मुलाखतींसाठी स्वतः च्या हुशारी विषयी, अकादमिक कामगिरीविषयी बोलणं गरजेचं असतं. मात्र नोकरी मिळाल्यावर, व्यवसायात, कलेत अपेक्षित यश मिळाल्यावर समोर भेटेल त्या व्यक्तीशी चांगुलपणाविषयी, स्वतःच्या कलागुणांविषयी, कर्तृत्वाविषयी प्रौढी मिरवणारं असं सतत बोलत राहाणं, हे केवळ अशोभनीय नाही, तर लाजिरवाणंही आहे. स्वत:लाच नव्हे, तर पूर्ण मानवजातीला स्वतःच स्वतः ची शेखी मिरवायला बंदी घालणारा कायदा करायची वेळ आली आहे. स्वतःच्या पण दिवस मार्केटिंगचे आहेत. स्वतःचं घोडं पुढं दामटवलं नाही, तर आपण शर्यतीत मागे पडू या विचारानं सगळे भयभीत झाले आहेत. या भयातून नवे अतिरेकी जन्माला येत आहेत. हळूहळू ऐकणाऱ्यांची संख्या कमी कमी होत जाईल आणि एक दिवस जगात स्वत:विषयी बोलणारेच तेवढे शिल्लक राहतील. पण ऐकणारेच नसतील तर त्यांनी आपल्या पराक्रमाचे पोवाडे गायचे तरी कोणापुढे? (ऑक्टोबर २०११)