पान:निवडक अंतर्नाद.pdf/५१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सेंटरम ३१ मे २००३. अंतर्नादने मुंबईत दादर-माटुंगा कल्चरल 'जनी प्रकटते मनातली उर्वशी...' हा कार्यक्रम सादर केला. त्या प्रसंगी दासू वैद्य, नीरजा आणि कविता महाजन यांची मुलाखत घेताना डॉ. महेश केळुसकर. २९ जुलै २०००. अंतर्नादचा पाचवा वर्धापनदिन. मुख्य वक्ते होते डॉ. स. ह. देशपांडे. त्या प्रसंगी डॉ. अनिल अवचट यांची विनया खडपेकर, मुग्धा यार्दी आणि अनिल शिदोरे यांनी प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर अवचट यांनी काष्ठशिल्प करण्याचे प्रात्यक्षिक व बासरीवादनही सादर केले. छायाचित्रात अवचट यांच्या डावीकडे अनिल शिदोरे. २ निवडक अंतर्नाद अंतर्नाद सांस्कृतिक समृद्धीसा नंतर झालेल्या कविसंमेलनात उपरोक्त चौघांशिवाय नलेश पाटील, संदेश ढगे, अशोक नायगावकर, माधव हुंडेकर, वर्जेश सोलंकी व इंद्रजित भालेराव यांनीही आपापल्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी होते त्या वर्षीच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुभाष भेण्डे. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमाला श्री. पु. भागवत, विश्वास पाटील, मेघना पेठे, अरुण म्हात्रे वगैरे अनेक साहित्यिक शेवटपर्यंत उपस्थित होते. (डावीकडे) कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी गप्पा मारताना वासंती व गंगाधर गाडगीळ आणि मंगेश पाडगावकर. (उजवीकडे) मध्यंतरात विश्वास पाटील, सुभाष भेण्डे आणि महेश केळुसकर. ५ ऑगस्ट २००५. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे पुण्यातील सभागृह. अंतर्नादचा दशकपूर्ती समारंभ. अध्यक्षस्थानी होते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर. त्याप्रसंगी बोलताना डॉ. सुभाष भेण्डे. त्यांच्या शेजारी कथाकार पंकज कुरूलकर. याच कार्यक्रमात 'बदलता भारत' या भानू काळे यांच्या अंतर्नादमध्ये क्रमशः प्रकाशित झालेल्या पुस्तकाचेही प्रकाशन डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या हस्ते झाले. मौज प्रकाशनाचे संजय भागवत व पंकज कुरूलकर यांचीदेखील भाषणे झाली.