पान:निवडक अंतर्नाद.pdf/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'शहीदां'च्या 'कुरबानी'ची कृतज्ञतापूर्वक जाणीव ही आत्तापर्यंत फारशा कोणालाही न खटकलेली अभिव्यक्ती आहे. एकनाथ बागूल, पत्रकार नगर, पुणे (दिवाळी २०११) 'इसराएल' असा उच्चार आहे अंतर्नाद मासिक वाचणे ही आमच्यासारख्या परदेशी राहणाऱ्या वाचकांसाठी मोठी आनंदाची बाब असते. २०११चा दिवाळी अंक मिळाला, परदेशात दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्यांसाठी, आपण भरकटले जाऊ नये म्हणून, मातृभाषेत संवाद करणे हा एक आधार असतो. अमेरिकेतल्या डॉ. भाग्यश्री बारलिंगे यांच्या लेखात हाच अनुभव व्यक्त झाला आहे त्याची तीव्रता परदेशात दीर्घकाळ वास्तव्य करणाऱ्यांनाच जाणवेल. बऱ्याचदा अंतर्नादच्या अंकात (आणि इतरही नियतकालिकांमधून) इसराएल देशाचा उल्लेख असतो. बरेच लेखक तो 'इसराईल', 'इस्रायल', 'इजेल', 'इस्त्राईल' असा वेगवेगळ्या प्रकारे लिहितात, असे लिहिणे चुकीचे असून हा शब्द 'इसराएल' असाच लिहिणे हिब्रू भाषेतील उच्चारानुसार योग्य आहे. जाता जाता - 'इसराएल' या शब्दाचा हिब्रू भाषेतला अर्थ 'ज्याने ईश्वरासह झुंजून यश मिळविले आहे तो इसराएल' असा आहे. मोझेस जोसेफ, अश्दोद, इसराएल (फेब्रुवारी २०१२ ) सहृदय वाचनप्रेमींसाठी वाचनसंस्कृती रुजवणे, वाढवणे ही एकट्या संपादकाची किंवा लेखकाची जबाबदारी आहे असे मला वाटत नाही. ही सामुदायिक प्रक्रिया आहे. किंबहुना वाचनसंस्कृती वाढवणे ही एक सातत्याने चालणारी चळवळ व्हायला पाहिजे असे मला वाटते. अंतर्नादमधील विविध लेख, कविता, पुस्तक परीक्षणे इ. तर आवडतेच पण विशेष आवडते ते म्हणजे वाचकांच्या पत्रव्यवहाराला दिलेले महत्त्वपूर्ण स्थान, अंतर्नादमधील लेखांवर वाचकांच्या अनेक महिने चर्चा चालू असतात. मला अंतर्नाद आवडल्यामुळे माझ्या कार्यालयातील सहकारी, मित्रमंडळी, नातेवाईक यांना सांगून वर्गणीदार वाढविण्यास सुरुवात केली. विवाह, सेवानिवृत्ती, प्रमोशन्स, परीक्षेतील यश इ. प्रसंगी कौतुक करण्यासाठी अंतर्नादची एक वर्षाची वर्गणी भरून अंक सप्रेम भेट देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर हेही सांगितले की अंक आवडल्यास एक वर्षानंतर आपल्या खर्चाने अंक चालू ठेवा. यावर्षी (२०१३) मी 'अंतर्नाद' आणि 'साधना'चे प्रत्येकी चाळीसहून अधिक वर्गणीदार केलेले आहेत. मला असे वाटते की अंतर्नादच्या किमान एक हजार वर्गणीदारांनी कमीत कमी दोन नवीन वर्गणीदार करायचे मनावर घेतले तर अंतर्नादला सहज दोन हजार नवे वर्गणीदार मिळू शकतील, अंतर्नादच्या नूतनीकरणाची टक्केवारी ८०% हून अधिक आहे. एकदा अंतर्नादचा वर्गणीदार झालेला अंक सहसा बंद करत नाही असा माझा अनुभव आहे. कुठलेही मासिक हे वर्गणीदारांच्या बरोबरच जाहिरातदारांच्या पाठिंब्यावर चांगली वाटचाल करू शकते. व्यापार-उद्योगाच्या सर्वच थरांत संपादकांच्या ओळखी असतीलच असे नाही. तसेच संपादकांनी दारोदार जाहिरातींसाठी हिंडावे हेही उचित वाटत नाही. मात्र वाचकांपैकी अनेकजण व्यापारी आस्थापने, उद्योगक्षेत्र, बँका इत्यादी ठिकाणी चांगल्या हुद्द्यावर असतात अशा 'सहृदय' वाचकांनी मनावर घेतले तर ते जाहिरातीसाठी शब्द टाकू शकतात. अंतर्नाद अनेक वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होत आहे व त्याचबरोबर आपला दर्जाही टिकवून आहे प्रमोद बेंद्रे, आनंदनगर, पुणे (जून २०१३) बंगाल आणि मराठे दिवाळी अंकातील रवीन्द्रनाथ टागोर यांच्यावरील लेख खूपच आवडला. मी चौदा वर्षे कोलकत्यात राहिलो आहे आणि माझ्या मते सर्वसामान्य बंगाली माणसाचे वाचन सर्वसामान्य मराठी माणसापेक्षा खूपच जास्त आहे कोलकत्यातील वार्षिक ग्रंथयात्रेला बंगाली जनतेकडून मिळणारा प्रतिसाद हे याचेच द्योतक आहे संगीत आणि नृत्य यांचीही आवड मला महाराष्ट्रापेक्षा बंगालमधे अधिक आढळली. बंगालमधील महाराष्ट्रीयांविषयीच्या भावना या संमिश्र आहेत. बंगालमधील मराठ्यांच्या स्वाऱ्या व त्यांतून निर्माण झालेली बंगाली समाजातील दहशत यांचे हे पर्यवसान असावे. मराठ्यांचा उल्लेख इथे 'बोरगीस' (बारगीर शब्दावरून) म्हणून केला जायचा. 'बोरगीस येतील हं, झोप पटकन' अशी लहान मुलांना भीती घालणारे एक अंगाईगीतही इथे प्रसिद्ध होते. मी जेव्हा तेथील आय. आय. एम. मधे प्रवेश घेतला तेव्हा जाणवले, की मराठ्यांच्या इतिहासाबद्दलच्या माझ्या धारणा आणि अन्य भारतात प्रचलित असणाऱ्या धारणा यांत खूप फरक आहे. आमच्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमात इतिहास हाही एक विषय होता. मराठ्यांची बंगालमधील प्रतिमा 'लुटारू' अशी होती व त्यांच्यापासून जेव्हा ब्रिटिशांनी बंगाल्यांना संरक्षण पुरवले तेव्हा बंगाली जनतेला खूप आनंद वाटला, असे माझ्या प्रा. नबेन्दू सेन या प्राध्यापकांकडून मी ऐकले तेव्हा मला धक्काच बसला. मला तोवर ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी प्रा. सेन यांनी मला शांतपणे समजावून सांगितल्या, कोलकत्यात लोअर सर्क्युलर रोड नावाचा एक रस्ता आहे. तो रस्ता म्हणजे मूळचा मराठ्यांना दूर ठेवण्यासाठी, ब्रिटिशांनी खणलेला एक खंदक होता व त्याला 'मराठा डिच' असे नाव होते! गिरीश वैद्य, बंगलोर, (जुलै २०१३) अंतरीच्या जिव्हाळ्याने लिहिलेला लेख 'अंतर्नाद'चा मेचा अंक कालच हाती आला. अंक उघडताच कै. प्रिय मुकुंदावर लिहिलेला आपला विस्तृत, सर्वस्पर्शी व यथोथित दर्शन घडविणारा, भावपूर्ण व अंतरीच्या जिव्हाळ्याने लिहिलेला लेख पाहावयास मिळाला, तो लेख वाचताना माझे डोळे कितीदा भरून आले ते आपल्याला कसे सांगू? लेख ती, के, शंकरभाऊ, मुकुंदा, शांताबाई या सर्वांच्या कार्याचे उत्तम मूल्यमापन करणारा, त्या सर्वांबद्दल आपल्या मनात असलेला निवडक अंतर्नाद •५०१