पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बसलो आहे. आपली वर्गणी भरू शकेन एवढी धनसंपदाही तूर्तास तरी माझ्याजवळ नाही. ज्या दिवशी तेवढी रक्कम हाती येईल, त्याच दिवशी अंतर्नादचा वर्गणीदार होईन, खात्री बाळगा. काही दैनिकांनी अग्रलेखातही आपल्या प्रयत्नांची दखल घेतली आहे. पहिल्याच वर्षी एवढे यश कुठल्याच वाड्मयीन नियतकालिकाला मिळाले नव्हते, पण ते यश नसून जबाबदारीच आहे, असे वाटते. वाचक चळवळीला आलेले शैथिल्य अंतर्नाद धुवून टाको, तुमच्या प्रयत्नांना वाचकांनी, लेखकांनी आणि जाहिरातदारांनी चांगले साह्य करावे. गणेश दिघे, प्रेरणा प्रतिष्ठान, चिंचवड, पुणे (जून १९९६) अंक खूप वेधक आहे. वाचकांच्या पत्रांना तुम्ही देत असलेली जागा तसेच कोणत्याही मतप्रवाहावर बंदी किंवा बहिष्कार न घालण्याचं (गंगाधर गाडगीळांनाही पुरस्कारलेलं) तुमचं धोरण या गोष्टी मला विशेष लक्षणीय व स्वागतार्ह वाटतात. राम पटवर्धन, मौज प्रकाशनगृह, गिरगाव, मुंबई (दिवाळी १९९६) वर्षभर तुमचा अंक फुकटात वाचला, आवर्जून तुम्हाला पत्र लिहून काही कळवावे असे वाटले नाही. मराठी भाषा आणि मराठी साहित्यसंस्कृती यांच्या नावाने दुकाने घातलेल्यांकडून वाईट अनुभव आले असल्याने आपल्या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा असे वाटत नव्हते. काही गोष्टी तर कशासाठी असाही प्रश्न पडत होता, रतीब घालणारे स्तंभगवळी आपल्यात आहेत. त्यांचे नको नको वाटणारे 'खुसखुशीत' लिखाण आवडते अशी शिफारसपत्रे देणारेही आहेत. 'अंतर्नाद' ही याला अपवाद नव्हता. मला आपली एक चांगले मासिक चालवण्याची धडपड सगळ्यात अधिक भावली, तुम्ही मासिक चालवताय म्हटल्यावर 'वा वा वा! किती किती छान!' म्हणणाऱ्यांचे लोंढे तुमच्यावर कोसळणार होतेच. संपादकाभोवती पिंगा घालणाऱ्यांची मराठीत वानवा नाही. आपल्या प्रामाणिक प्रयत्ना दाद द्यावी, नव्हे त्याला आपल्यापरीने मदत करावी, असे वर्षभर विचार करून मी ठरवलेय, सोबत २,००० रुपये माझे + २,००० रुपये माझ्या मुलीच्या नावाचे असे ४,००० रुपये + गेल्या वर्षी आपण सप्रेम भेट म्हणून पाठवलेल्या अंकांचे १६० असे एकूण रुपये ४,१६०/- चेकने पाठवले आहेत. * पांडुरंगशास्त्रींचे विचार आपण छापत असता, मला वाटते, त्यांचे विचार छापण्यापेक्षा त्यांच्या भक्तीतून शक्ती निर्माण करणाऱ्या कार्याची ओळख (रिपोर्ट नव्हे) करून देणारे, त्यांच्या स्वाध्यायात गुंतलेल्या सामान्य माणसाला त्यांच्यापासून प्रेरणा aft कशी मिळते याबद्दलचे अनुभव छापा, पांडुरंगशास्त्रींचे शब्द प्रभावी नाहीत; पण त्यांचे कार्य प्रभावी आहे. ४८६ निवडक अंतर्नाद शक्य असेल तर डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे लेख आपण पुन्हा छापण्याचा विचार करा. पांडुरंगशास्त्रींचा विचार (त्यातला, कर्मठपणा म्हणू का सनातनीपणा म्हणू, वगळून) पांडुरंगशास्त्रींच्या आधी डॉ. पु. ग. सहस्रबुद्ध्यांनी सांगितलाय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक विचार शक्य असतील तर छापा, लोकहितवादींची काही पत्रे, आगरकरांचे काही लेख पुन्हा छापण्याची नितांत आवश्यकता आहे खास. नारायण आठवले, नवी दिल्ली (दिवाळी १९९६) 'अंतर्नाद'चे दोन अंक प्राप्त झाले. खरे तर दोन्ही अंक पाहिल्यावर आणि वाचल्यावर त्वरीत पत्र लिहिणार होतो. परंतु याच दरम्यान नेताजींवरील नव्या कादंबरीसाठीच्या अभ्यासासाठी जपानला जावे लागले. त्यामुळे वेळेत उत्तर लिहिता आले नाही, क्षमस्व, आपले सर्व अंक एवढे चांगले आहेत की, त्याला दृष्ट लागू नये ही सदिच्छा, विशेषत: यशवंत राजंणकर यांचे हॉलिवूड चित्रपटांवरचे लेख मला खूप आवडले. विश्वास पाटील, उपजिल्हाधिकारी, ठाणे (डिसेंबर १९९६ ) हृदयविकारामुळे मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या बायकोने मला अंतर्नादचा अंक वाचायला आणून दिला, तो अंक वाचल्यावर माझ्या निराश मनात चैतन्य जागृत झाले. जगून जगासाठी भरीव काहीतरी करायची इच्छा प्रबळ झाली. त्यातील 'इथे व तेथे' ही चैताली विजय मोंडकर, वय वर्षे १५, हिची कविता वाचून मी भारावलो व तिच्याशी पत्रव्यवहार व दूरध्वनीवर संभाषण करून गेल्या आठवड्यात तिची व तिच्या सर्व कुटुंबियांची तिच्या घरी जाऊन भेट घेतली. एका अत्यंत सुसंस्कृत कुटुंबाशी माझे कायमचे संबंध जोडले गेले. जीवन आनंदाने जगण्याचा अंतर्नाद तुमच्या प्रयत्नांमुळे मिळाला याची पावती देण्यास माझे शब्द तोकडे पडतात, चैतन्य कोप्पीकर, लॉ कॉलेज रोड, पुणे (एप्रिल, १९९७) अंतर्नादमधील 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' वरचे यशवंत रांजणकर यांचे दोन लेख (मार्च व एप्रिल १९९७) वाचले ते आवडले हे कळविण्यासाठी हे पत्र लिहित आहे. पुन्हा एकदा 'लॉरेन्स' डोळ्यांपुढे उभा राहिला. या लेखात पटकथालेखक म्हणून डेव्हिड गार्नर याचा उल्लेख आहे. मला अंधुक याचा संदर्भ आजीव सदस्य योजनेशी आहे. अनेक कारणांमुळे ती योजना पुढे अंतर्नादने बंद केली व सर्व ८३५ आजीव वर्गणीदारांना त्यांचे दोन-दोन हजार रुपये परत केले. पण त्यांनी वर्गणीदार म्हणून कायम राहावे व शक्य झाल्यास त्यांच्यासारखाच अजून एक उत्तम वाचक वर्गणीदार म्हणून मिळवून द्यावा असे आवाहनही केले. सुदैवाने बहुतेक वर्गणीदारांनी हार्दिक प्रतिसाद दिला व त्यामुळे वर्गणीदारांची संख्या दुप्पट झाली. दुर्दैवाने त्यात पुढे फारशी भर पडू शकली नाही; पण तो सगळा एक वेगळाच विषय आहे. संपादक